आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकात फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली तरी दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेने शनिवारी इंग्लंडवर तीन धावांनी निसटता विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण झाले असून त्यांनी गट-१मधून आगेकूच केली आहे.
एबी डी’व्हिलियर्स आणि हाशीम अमला यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने निर्धारित षटकांत ५ बाद १९६ धावांचा डोंगर उभा केला होता. हे उद्दिष्ट साध्य करताना इंग्लंडने सुरेख सुरुवात केली. मात्र ठरावीक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या षटकांत २२ धावांची आवश्यकता असताना टिम ब्रेस्ननने डेल स्टेनला दोन चौकार आणि एक षटकार लगावला. मात्र त्यांना विजयासाठी तीन धावा कमी पडल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेन पारनेलने तीन बळी मिळवले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2014 रोजी प्रकाशित
दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत
आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकात फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली तरी दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत मजल मारली.
First published on: 30-03-2014 at 08:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England v south africa t20 world cup