मँचेस्टर युनायटेडला या मोसमात इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन २६ वर्षांनंतर युनायटेडला मोसमाअखेरीस अलविदा करणार आहेत. फग्र्युसन यांनी आपल्या २६ वर्षांच्या कारकीर्दीत युनायटेडला १३ इंग्लिश प्रीमिअर लीग जेतेपद तसेच दोन वेळा युरोपियन अजिंक्यपद मिळवून दिले.

‘‘कालपरवापर्यंत माझ्या निवृत्तीची चर्चा कुठेही नव्हती. पण मी बऱ्याच कालावधीपासून त्याबाबत विचार करत होतो. निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. युनायटेडला सक्षम बनवल्यानंतरच मी निवृत्त होत आहे,’’ असे फर्ग्युसन यांनी सांगितले. निवृत्तीनंतरही ते युनायटेडचे संचालक आणि क्लब अ‍ॅम्बेसेडर म्हणून कार्यरत असणार आहेत.