fifa world cup 2022 argentina vs australia match prediction zws 70 | Loksatta

FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा

मेसी आणि डी मारियाच्या अनुभवाच्या जोरावर अर्जेटिना संघ आपले आव्हान राखून आहे.

FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
लिओनेल मेसी

दोहा : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत बरेच धक्कादायक निकाल नोंदवले गेले आहेत. अशाच एका धक्क्यातून सावरत लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने उपउपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला. आता शनिवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीतील लढतीत अर्जेटिनाची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. 

मेसी आणि डी मारियाच्या अनुभवाच्या जोरावर अर्जेटिना संघ आपले आव्हान राखून आहे. पोलंडविरुद्ध गटातील अखेरच्या साखळी सामन्यात अर्जेटिनाने लौकिकाला साजेसा खेळ केला होता. अर्जेटिनाच्या वर्चस्वामुळे या सामन्यात प्रतिस्पर्धी पोलंडच्या कक्षातच संपूर्ण खेळ झाला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध दर्जेदार कामगिरी करण्याचा अर्जेटिनाचा प्रयत्न असेल.

गतविजेते फ्रान्स आणि डेन्मार्क यांचा समावेश असलेल्या ड-गटातून ऑस्ट्रेलियाने बाद फेरीचा टप्पा गाठला. आता अर्जेटिनाला धक्का देण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज आहे. मेसीला रोखणे हे ऑस्ट्रेलियापुढील सर्वात मोठे आव्हान असेल.

’ वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१,

१ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 06:03 IST
Next Story
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर