स्पेनने कोस्टा रिकाचा ७-० असा पराभव करून फिफा विश्वचषक २०२२ ची धमाकेदार सुरुवात केली. फेरान टोरेसच्या दोन गोलमुळे स्पेनने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. स्पेनचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय. यापूर्वी २४ जून १९९८ रोजी त्याने बल्गेरियाचा ६-१ असा पराभव केला होता. हा सामना जिंकल्यानंतर स्पेनचा संघ जपानला मागे टाकत ग्रुप-ई मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. याच सामन्यात स्पेनचा मिडफिल्डर गॅवीने त्या सातपैकी एक गोल करत ब्राझीलच्या महान पेलेनंतरचा सर्वात तरुण विश्वचषक गोलकर्ता बनला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९५८च्या फिफा विश्वचषकातील ब्राझीलच्या महान खेळाडू पेलेनंतरचा सर्वात तरुण विश्वचषक गोलकर्ता बनला. १७व्या वर्षी पेलेने स्वीडनमध्ये ब्राझीलला पहिले विश्वचषक जिंकून दिले होते. त्या विश्वचषकात त्याने एकूण सहा गोल केले होते. १८ वर्षीय गॅवीने विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण स्पॅनिश खेळाडू बनल्यानंतर सामन्यातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू (Most Valuable Player) असा पुरस्कारही मिळवला. गॅवीने २००६ विश्वचषकातील युक्रेनविरुद्ध गोल करणाऱ्या १९ वर्षीय सेस्क फॅब्रेगासचा विक्रम मोडला.

गॅवीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “मी या कामगिरीबद्दल आनंदी आहे. मला माझ्या गोलपेक्षा सर्वात जास्त काळजी होती ती सामन्याची, याचे कारण की आम्ही विश्वचषकातील पहिलाच सामना आणि त्यात परत मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळत आहे त्यामुळे काही चुका तर होणार नाहीत ना आम्ही सामना नाही जिंकलो तर पुढे कसे होईल हेच सर्व विचार माझ्या डोक्यात सुरु होते. मात्र आमच्या संघाने अफलातून खेळ करत तब्बल ७ गोल करून सामना खिशात घातला.”

त्याने केलेल्या गोलविषयी तो म्हणाला, “त्या ७ गोलमध्ये मी सुद्धा एक गोल करत संघासाठी खारीचा वाटा उचलला याचा मला आनंद आहे. पत्रकाराने ज्यावेळेस त्याला सांगितले की, तू ब्राझिलचा महान खेळाडू पेलेनंतर सर्वात तरुण खेळाडू म्हणून गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहेस. यावर त्याने उत्तर देत म्हणाला की, “अर्थात, या यादीत दुसरे स्थान मिळणे हा एक सन्मान आहे आणि यामुळे मला खरोखर आनंद होत आहे.”

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: कोस्टा रिकाविरुद्ध स्पेनचा गोलधडाका

सामन्याच्या ११व्या मिनिटाला ओल्मोने डावीकडून केलेल्या चालीवर गेवीकडे चेंडू पास केला, त्याने तो परत ओल्मोकडे दिला. या वेळी ओल्मोने कोणतीही चूक केली नाही आणि धडधडणाऱ्या शॉटवर नवासला चकवून गोल केला. स्पेनचा विश्वचषकातील हा १०० वा गोल ठरला. ७४व्या मिनिटाला अल्वारो मोराटाकडून उजव्या पायाचा शक्तिशाली शॉट गोल पोस्टकडे चेंडू वळवत गॅवीने स्पेनची आघाडी ५-० अशी वाढवली आणि चेंडू पोस्टवर आदळला आणि गोलमध्ये गेला. सोलरने ९०व्या मिनिटाला तर मोराटाने दुखापतीच्या दुसऱ्या मिनिटाला गोल करत स्पेनला ७-० ने आघाडीवर नेले, जे अंतिम गुण ठरले. यासह स्पेनने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 the spanish footballer gavi became the youngest player to score a goal in the world cup after pele avw
First published on: 24-11-2022 at 09:59 IST