फिफा विश्वचषक २०२२ चा हंगाम यंदा कतारमध्ये खेळला जात आहे. ही विश्वचषक स्पर्धा अनेक वादांनी पुढे जात आहे. दिवसाढवळ्या चाहत्यांच्या वस्तू चोरीला जात आहेत. यासोबतच प्रतिस्पर्धी संघांचे चाहतेही एकमेकांशी लढत आहेत. आधी मेक्सिको संघाच्या समर्थकांनी लिओनेल मेस्सीला शिवीगाळ केली, त्यानंतर मेस्सीच्या चाहत्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. हे प्रकरण शांत झालेले नाही तोच मारहाणीचे नवे प्रकरण समोर आले आहे.

यावेळी इंग्लंड आणि वेल्स या दोन प्रतिस्पर्धी संघांचे चाहते एकमेकांशी भिडले. हाणामारीचे वळण इतके धोकादायक झाले की, दोन्ही बाजूच्या समर्थकांनी एकमेकांवर खुर्च्या, बाटल्या आणि जे काही हाती आले ते एकमेकामना फेकून मारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रस्त्याच्या मधोमध खुर्ची आणि लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण –

इंग्लंड आणि वेल्सच्या चाहत्यांमधील या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक मिनिट आणि ४६ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बहुतांश समर्थक नशेत असलेले दिसत आहेत. यासोबतच ते एकमेकांना खुर्ची आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. हे संपूर्ण भांडण रस्त्याच्या मधोमध असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर होताना दिसत आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) रात्री उशिराचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या दिवशी इंग्लंडने स्पर्धेतील आपला दुसरा सामना खेळला. हा सामना अमेरिकेविरुद्ध होता, जो एक ही गोल न नोंदवता बरोबरीत संपला.

इंग्लंडला तिसरा सामना वेल्सविरुद्ध होणार आहे –

या फिफा विश्वचषकात इंग्लंडने आपला पहिला सामना इराणविरुद्ध खेळला आणि त्यात ६-२ असा विजय मिळवला. यानंतर अमेरिकेविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित राहिला. या स्पर्धेत इंग्लंड आणि वेल्सचा समावेश एकाच गट-ब मध्ये आहे. आता इंग्लंड संघाला ३० नोव्हेंबरला वेल्सविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: नेमारची दुखापतीबाबत मोठी अपडेट; म्हणाला, ‘मला ब्राझीलचा शर्ट….’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेल्स संघ या स्पर्धेत एकही सामना जिंकू शकलेला नाही –

दुसरीकडे, इंग्लंड विरुद्ध वेल्सचा हा स्पर्धेतील तिसरा सामनाही असेल. यापूर्वी वेल्सने या विश्वचषकात आपला पहिला सामना फक्त अमेरिकेविरुद्ध खेळला होता. सामना १-१ असा बरोबरीत संपला. यानंतर वेल्सचा दुसरा सामना इराणविरुद्ध होता, ज्यात त्यांना ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत वेल्सचा संघ जवळपास बाहेर गेला आहे. तर इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. तरीही त्यांना सामना गमवावायचा नाही.