सन्मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये मुंबईचा शिवशक्ती संघ आणि पुण्याच्या सुवर्णयुग संघांमध्ये अंतिम फेरीची लढत रंगणार आहे. पुरुषांमध्ये महिन्द्रा विरुद्ध ठाणे पोलीस आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोष्टल अशा उपांत्य लढती होतील.
महिलांच्या उपांत्य सामन्यात शिवशक्तीने उपनगरच्या पोईसर जिमखान्याला ४६-११ असे सहज नमविले. सुवर्णा बारटक्केचा अष्टपैलू खेळ, त्याला आदिती चव्हाण व ऋतुजा देऊळकर यांची मिळालेली चढाई-पकडीची उत्कृष्ट साथ यामुळे शिवशक्तीने ३५ गुणांनी हा सामना खिशात टाकला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याच्या सुवर्णयुगने मुंबईच्या पोलीस जिमखाना संघाचा प्रतिकार २२-१९ असा संपविला. व्यावसायिक गटातील पुरुषांच्या उपउपांत्य सामन्यात महिन्द्राने बँक ऑफ इंडियाला २०-७ असे सहज नमविले. विलास जाधव, अमोल वडार यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर महिन्द्राने १३ गुणांनी उपांत्य फेरी गाठली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2013 रोजी प्रकाशित
शिवशक्ती, सुवर्णयुग यांच्यात अंतिम लढत
सन्मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये मुंबईचा शिवशक्ती संघ आणि पुण्याच्या सुवर्णयुग संघांमध्ये अंतिम फेरीची लढत रंगणार आहे. पुरुषांमध्ये महिन्द्रा विरुद्ध ठाणे पोलीस आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोष्टल अशा उपांत्य लढती होतील.
First published on: 18-02-2013 at 02:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final fight between shivshakti and suvarnayug