IND vs AUS head to head and record at Narendra Modi Stadium Ahmedabad: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या या मैदानावर दोन्ही संघ यापूर्वी अनेक सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा येथे विक्रम चांगला राहिला आहे ,पण ऑस्ट्रेलियन संघाचा येथे भारतापेक्षा चांगला विक्रम राहिला आहे.

भारतीय संघाने १९८४ ते २०२३ या कालावधीत अहमदाबादच्या या मैदानावर एकूण १९ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने ११ सामने जिंकले आणि ८ सामने गमावले. म्हणजे विजयाची टक्केवारी ५७.८९ होती. घरच्या मैदानाप्रमाणे येथे भारतीय संघाची कामगिरी सरासरी राहिली, असे म्हणता येईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जुन्या मोटेरा स्टेडियमवर खेळले गेले आहेत. त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. म्हणजेच कांगारूंची विजयाची टक्केवारी ६६.६६ इतकी आहे, जी टीम इंडियापेक्षा सरस आहे.

Australia made changes in T20 WC 2024 Squad
T20 World Cup 2024: दिल्ली गाजवणाऱ्या फलंदाजाला मिळाली ऑस्ट्रेलिया संघात संधी
kolkata knight riders faces sunrisers hyderabad in ipl 2024 qualifier 1
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: ‘क्वॉलिफायर१’च्या सामन्यात आज कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान, अंतिम फेरीचे लक्ष्य!
Kagiso Rabada Injury is Biggest Tension for South Africa Cricket Board
वर्ल्डकप जिंकण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेला चिंता भेडसावतेय कोटा सिस्टमची, रबाडाची दुखापत ठरलंय निमित्त
Matthew Hayden's daughter and MI fans chanting "Mumbai Cha Raja, Rohit Sharma"
IPL 2024: मॅथ्यू हेडनची लेकही हिटमॅनची फॅन, चाहत्यांबरोबर ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ म्हणत केलं चीअर; VIDEO व्हायरल
hardik pandya look under intense pressure aaron finch opinion
हार्दिक दडपणाखाली; माजी क्रिकेटपटू आरोन फिंचचे मत; संघाच्या हाराकिरीनंतर कर्णधार टीकेच्या केंद्रस्थानी
ICC Annual Team Rankings Announced
वनडे आणि ट्वेन्टी२० प्रकारात टीम इंडिया अव्वल; आयसीसीची वार्षिक क्रमवारी जाहीर
How drop in pitches are made T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : ‘ड्रॉप इन पिचेस’ म्हणजे काय? ज्या खेळपट्टीवर भारत-पाकिस्तान सामना खेळला जाणार
South Africa squad announced for T20 World Cup 2024
T20 WC 2024 : विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर! IPL मध्ये डंका वाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

अहमदाबादमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वेळा झालाय सामना –

अहमदाबादच्या या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया याआधी तीनदा भिडले आहेत. ऑक्टोबर १९८४ मध्ये दोन्ही संघ येथे पहिल्यांदा भिडले होते. कांगारूंनी हा सामना एकतर्फी ७ गडी राखून जिंकला होता. दोनच वर्षांनंतर येथे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. या सामन्यात भारतीय संघाने ५२ धावांनी विजय मिळवला. या मैदानावर दोन्ही संघांमधील शेवटचा सामना मार्च २०११ मध्ये झाला होता. तेव्हा भारतीय संघाने ५ गडी राखून विजयी झाला होता. म्हणजेच अहमदाबादच्या या मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर हेड टू हेड सामन्यांमध्ये वर्चस्व राखले आहे.

पूर्वी हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखले जायचे –

अहमदाबादमधील मोटेरा येथे असलेले हे मैदान पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावर होते. त्याला सरदार पटेल स्टेडियम किंवा मोटेरा स्टेडियम असे म्हणले जात होते. १९८४ मध्ये येथे प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. अलीकडच्या काळात या स्टेडियमला ​​भव्य स्वरूप देण्यात आले आहे. प्रेक्षक क्षमता वाढवण्यासोबतच संपूर्ण स्टेडियमचा कायापालट करण्यात आला आहे. या नूतनीकरणानंतर या मैदानाला नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले. १ लाख ३२ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.