scorecardresearch

WPL 2023 Prize Money: ऑरेंज कॅपपासून पर्पल कॅपपर्यंत, जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, पाहा संपूर्ण यादी

WPL 2023 Award List: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. त्यांनी दिल्ली कॅपिटल्समात करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यानंतर या स्पर्धेत कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळाले जाणून घ्या.

WPL 2023 Award List and Prize Money
मुंबई इंडियन्स (फोटो-ट्विटर)

WPL 2023 Award List and Prize Money: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सचा ७ गडी राखून पराभव करून महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ९ गडी गमावून १३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने हरमनप्रीत कौरच्या (३७) आणि नॅट सायव्हर ब्रंटच्या (६०*) धावांच्या जोरावर १३२ धावांचे लक्ष्य गाठले. विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला बक्षीस म्हणून ६ कोटी रुपये, तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटी रुपये मिळाले.

याशिवाय जाणून घेऊया कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळाला?

१.प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, हेली मॅथ्यूज – ५ लाख रुपये
२.पर्पल कॅप, हेली मॅथ्यूज – ५ लाख रुपये
३.ऑरेंज कॅप, मेग लॅनिंग – ५ लाख रुपये
४.कॅच ऑफ द सीझन, हरमनप्रीत कौर – ५ लाख रुपये
५.पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीझन, सोफी डिव्हाईन – ५ लाख रुपये
६.इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, यास्तिका भाटिया – ५ लाख रुपये
७.प्लेअर ऑफ द मॅच फायनल नेट सायव्हर-ब्रंट – २.५० लाख रुपये
८.पॉवरफुल स्ट्रायकर फायनल, राधा यादव – १ लाख रुपये
९. फेअरप्ले अवॉर्ड: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने शेअर केले
१०. स्पर्धेतील पॉवरफुल स्ट्रायकर: सोफी डिव्हाईन (RCB) ९५ मीटर षटकार
११.टूर्नामेंटमधील उदयोन्मुख खेळाडू: यास्तिका भाटिया (मुंबई इंडियन्स)
१२. मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: हेली मॅथ्यूज, मुंबई इंडियन्स (२७१ धावा, १६ विकेट)

सामन्याबद्दल बोलायचे, तर दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अनेकदा जेतेपदाच्या सामन्यात संघ हा निर्णय घेतो, पण मेग लॅनिंगचा हा निर्णय संघाच्या फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा सिद्ध केला. संपूर्ण हंगामात फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या टॉप ऑर्डरने अंतिम सामन्यात निराशा केली. मेग लॅनिंग (३५) वगळता कोणत्याही आघाडीच्या खेळाडूला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

हेही वाचा – Video : सचिन तेंडुलकरने आईबरोबरचा आंबा खातानाचा व्हिडीओ केला शेअर, चाहते म्हणाले…

दिल्लीची अवस्था इतकी वाईट झाली होती की, संघाने ७९ धावांत ९ विकेट गमावल्या होत्या, पण शिखा पांडे आणि राधा यादव यांनी अखेरच्या विकेटसाठी ऐतिहासिक खेळी खेळून संघाला १३१ धावांपर्यंत नेले. दोघींमध्ये १०व्या विकेटसाठी नाबाद ५२ धावांची भागीदारी झाली. टी-२० क्रिकेटमधील शेवटच्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यादरम्यान शिखाने १७ चेंडूत २७ धावा केल्या तर राधाने १२ चेंडूत तेवढ्याच धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या