What is device worn by Indian cricketers including Virat Siraj : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषका २०२३चा अंतिम सामना उद्या म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती येत आहेत, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कपिल देव यांचा समावेश आहे. या विश्वचषक सामन्यांदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसचे आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या मनगटावर घातलेले उपकरण.

सोशल मीडियावर अनेकांनी या उपकरणाबद्दल उत्सुकता दाखवली आहे. आज आपण विराट कोहली, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर आणि इतर भारतीय खेळाडूंच्या मनगटावर असलेले हे उपकरण काय आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

वास्तविक, क्रिकेटपटूंच्या मनगटावर बांधलेले हे उपकरण एक फिटनेस बँड आहे, जे हूप कंपनीचे आहे. हूप हे विल अहमद यांच्या मालकीचे स्टार्टअप आहे आणि त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंचे बँडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या बँडमध्ये ओपन एआयचा चॅट जीपीटी सपोर्ट (हूप कोच) देखील उपलब्ध आहे. याबाबत आयसीसीचा काय नियम आह? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर प्रत्यक्षात आयसीसीने खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या कम्युनिकेशन उपकरणांवर बंदी घातली आहे. म्हणजेच मैदानावरील सामन्यादरम्यान खेळाडूंना स्मार्टवॉच वगैरे काहीही घालता येणार नाही.

हेही वाचा – IND vs AUS Final: एअर शोपासून प्रीतमच्या परफॉर्मन्सपर्यंत, फायनलच्या दिवशी कोण-कोणते कार्यक्रम होणार? बीसीसीआयने दिली माहिती

या उपकरणावर कोणतीही स्क्रीन नाही –

हूप कंपनीच्या या फिटनेस बँडला कोणतीही स्क्रीन नसल्यामुळे खेळाडू त्याच्याशी काहीही संवाद साधू शकत नाहीत. हा फिटनेस बँड मोबाईल ॲपद्वारे चालतो आणि झोपेचे चक्र, तणाव, शरीराची स्थिती, हृदय गती इत्यादी सर्व प्रकारची माहिती ॲपद्वारे देतो. या फिटनेस बँडचा डेटा ९९% अचूक आहे आणि उद्योगातील सर्वोत्तम श्रेणीमध्ये गणला जातो. क्रीडापटू हे उपकरण घालण्यास प्राधान्य देतात. कारण ते विचलित करत नाही आणि त्यांच्या रिकव्हरी आणि दिवसभर कामानुसार क्रियाकलाप, आहार इत्यादी सुचवते.

हेही वाचा – Mohammed Shami: योगी सरकारने घेतला मोठा निर्णय! मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार स्टेडियम

या फिटनेस बँडची खास गोष्ट म्हणजे याला चार्ज करण्यासाठी हातातून काढण्याची गरज नाही. या बँडसोबत एक बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो बँडवर जोडला जावा आणि तो बॉडी मॉनिटरिंगसह चार्ज केला जातो. या फिटनेस बँडमध्ये चॅट जीपीटी देखील समर्थित आहे, जे तुम्हाला आरोग्याशी संबंधित माहिती मिळविण्यात मदत करते.

हेही वाचा – Mohammed Shami: योगी सरकारने घेतला मोठा निर्णय! मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार स्टेडियम

हा फिटनेस बँड भारतात उपलब्ध नाही –

सध्या हा फिटनेस बँड भारतात उपलब्ध नाही. १२ महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह त्याची किंमत $239 म्हणजेच १९,९०६ रुपये आहे. लक्षात ठेवा, हा फिटनेस बँड ॲपद्वारे चालतो आणि आपल्याला ॲपमध्येच सर्व वैशिष्ट्ये आणि डेटा मिळेल.