लंडन : कॅनडाची डॅनिएले मगेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू ठरणार आहे. २०२४च्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेसाठी मगेहीचा कॅनडाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. २९ वर्षीय मगेही सलामीची फलंदाज असून लिंगबदलाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पात्रता निकष तिने पूर्ण केले आहेत.

हेही वाचा >>> Sunil Chettri: गुड न्यूज! फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, पत्नी सोनमने दिला मुलाला जन्म

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पात्रता स्पर्धा ४ ते ११ सप्टेंबर या कालावधी लॉस एंजलिस येथे खेळवली जाणार आहे. कॅनडाचा संघ अर्जेटिना, ब्राझील आणि अमेरिका यांच्याविरुद्ध ‘आयसीसी अमेरिकास’ पात्रता स्पर्धेत खेळणार आहे. यातील विजेता संघ जागतिक पात्रता स्पर्धेत खेळेल. ‘‘माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. माझ्या समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता,’’ अशी भावना कॅनडाच्या महिला संघात निवड झाल्यानंतर मगेहीने व्यक्त केली. मगेहीने फेब्रुवारी २०२०मध्ये ऑस्ट्रेलियातून कॅनडा येथे स्थलांतर केले.