Cricket Year Ender 2022: २०२२ हे वर्ष भारतीय क्रीडा विभागासाठी कधी चांगले तर कधी वाईट अशा स्वरूपाचे ठरले. खासकरून पुरुषांच्या क्रिकेटमध्ये विचार केल्यास असे दिसून येईल की यावर्षी चार मोठ्या स्पर्धा पार पडल्या. त्यात मानाची समजली जाणारी टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा समावेश आहे. त्याचबरोबर धक्कादायक आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या घडामोडी देखील घडल्या. अनेक वेगळ्या  या वर्षी पुरुष क्रिकेट जगताशी निगडीत अनेक घटना घडल्या, क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंनीही हे वर्ष संस्मरणीय बनवले. यासर्वाचा धांडोळा आपण आज घेणार आहोत.

गुजरात पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनली

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष आश्चर्यकारक ठरले आहे. २०२२ मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली आहे. पाठीच्या दुखापतीनंतर मैदानात परतलेल्या हार्दिक पांड्यावर पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याचे दडपण आले. पण दडपणाखाली बुजून जाण्याऐवजी हा खेळाडू आणखी ताकदीने समोर आला.

rohit needs rest due to exhaustion from playing cricket continuously opinion of michael clarke
रोहितला विश्रांतीची गरज! सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम; मायकल क्लार्कचे मत
Madan Lal's reaction to Indian fast bowlers
T20 World Cup 2024 : “भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण कमकुवत…”, माजी विश्वविजेत्या खेळाडूचं मोठं वक्तव्य
Indian Team Announced for World Cup 2024
T20 World Cup 2024 : साई-अभिषेकसह IPL 2024 गाजवणाऱ्या ‘या’ पाच खेळाडूंना वर्ल्डकपसाठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान
aman
पुरुष कुस्तीगिरांबाबत नाराजी, पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी पूर्वीचाच संघ!
Uber Cup Badminton Tournament Indian women team in quarterfinals sport news
उबर चषक बॅडमिंटन स्पर्धा: भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत
jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 

आयपीएल लिलावापूर्वी हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहून मुंबई संघाने त्याला सोडले होते. मुंबईतून वगळल्यानंतर प्रथमच आयपीएलमध्ये भाग घेणारा संघ गुजरात टायटन्सने पांड्याला संघात घेतले. हा असा काळ होता जेव्हा पांड्याच्या कारकिर्दीवर आणि कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. गुजरातच्या या निर्णयावर क्रिकेटच्या काही दिग्गजांनीही आश्चर्य व्यक्त केले. गुजरात टायटन्सने पांड्याला १५ कोटींमध्ये ड्राफ्ट केले. एवढेच नाही तर गुजरातने हार्दिकला संघाचा कर्णधार बनवले. हार्दिकनेही संघाला निराश केले नाही आणि दमदार कामगिरी करत संघाला चॅम्पियन बनवले. या विजयानंतर पांड्याच्या कर्णधारपदाचेही कौतुक झाले. आता परिस्थिती अशी आहे की, पांड्याला भारताचा नवा कर्णधार बनवण्याचा सल्ला दिला जात आहे.

आशिया चषक २०२२

शेवटचा आशिया चषक २०१८ मध्ये झाला होता. त्यानंतर २७ ऑगस्टपासून सुरू झालेली ही स्पर्धा यावर्षी ११ सप्टेंबरपर्यंत आहे. या कालावधीत सहा संघांनी भाग घेतला, ज्यामध्ये भारत पाकिस्तान आणि हाँगकाँगसह, तर अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश ब गटात होते. भारताला केवळ सुपर फोरचा टप्पा गाठता आला आणि श्रीलंकेने अनपेक्षितपणे ही स्पर्धा जिंकली. बीसीसीआयने आयोजित केलेल्या युएई मध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. पण त्यात भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने शानदार प्रदर्शन केले. आशिया चषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद १२२ धावा करत टी२० मधील पहिले शतक झळकावले. विराट कोहलीने टी२० विश्वचषकातही चांगली कामगिरी केली होती. यावर्षी कोहलीने २० सामन्यात ७८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान कोहलीच्या बॅटने ८ अर्धशतकं आणि १ शतकी खेळी पाहायला मिळाली. तसेच बांगलादेशविरुद्ध त्याने क्रिकेट कारकीर्दीतील ७२ शतक ठोकत रिकी पाँटिंगला मागे टाकले.

हेही वाचा:   PAK vs ENG: चैन कुली की मैन कुली पार्ट २! इंग्लंडच्या गोलंदाजाने पदार्पणाच्या कसोटीत घेतल्या पाच विकेट्स

टी२० विश्वचषक २०२२

या वर्षी आम्हाला ऑस्ट्रेलियात झालेला आणखी एक टी२० विश्वचषक पाहायला मिळाला. गेल्या वर्षी यूएईमध्ये जे घडले त्याचीच पुनरावृत्ती याही विश्वचषकात पाहायला मिळाली. कोविडमुळे २०२२ चा विश्वचषक २०२० मध्ये होऊ शकला नाही, ज्यामुळे सलग दोन वर्षात एकापाठोपाठ एक टी२० विश्वचषक बघायला मिळाले. उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागल्याने भारताची मोहीम चांगली गेली नाही. अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्याने इंग्लंडने यावेळी विजेते असल्याचे सिद्ध केले. यापूर्वी, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा विश्वचषकातील सर्वात ब्लॉकबस्टर सामना ठरला होता जिथे विराट कोहलीने आतापर्यंतची सर्वात मोठी टी२० खेळी खेळली होती. २०१३ नंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीये.

हेही वाचा:   FIFA World Cup Final: पुरेपूर कोल्हापूर! मेस्सीच्या अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला अन् कोल्हापुरात आनंदाला आले उधाण

अंध टी२० विश्वचषक

जे मोठ्यांना जमले नाही ते या दृष्टिहीन क्रिकेटपटूंनी करून दाखवले. अंधांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. त्याने सलग दोनवेळा स्पर्धेची अंतिम फेरी जिंकली आहे. टीम इंडियाने हा सामना १२० धावांनी जिंकला. भारतीय संघाने यापूर्वी २०१२ आणि २०१७ मध्येही ही स्पर्धा जिंकली होती. या विश्वचषकाच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे. २०१२ मध्ये प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि त्यात भारताने विजेतेपद पटकावले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या दुसऱ्या स्पर्धेत, टीम इंडिया बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये चॅम्पियन बनली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. आता २०२२ मध्ये भारताने या स्पर्धेत आपली हॅटट्रिकही पूर्ण केली.