हल्लीच्या दिवसात खेळ आणि सेलिब्रेशन हे एक नवीन समीकरण तयार होऊ लागलं आहे. हॉकी, फुटबॉलच्या मैदानात गोल मारला किंवा क्रिकेटच्या मैदानात गडी बाद केला की निरनिराळ्या प्रकारचे सेलिब्रेशन केले जाते. फुटबॉलच्या मैदानात तर सेलिब्रेशनला उधाण येते. आपल्या अंगावरील जर्सी काढून मैदानभर फिरणे आणि आनंद साजरा करणे हे तर खूपच साधारण होऊ लागले आहे. पण नुकताच एका फुटबॉलरने सेलिब्रेशनच्या भरात एक विचित्र प्रकार केल्याचे समोर आले.

कॅमेरूनचा फुटबॉलर क्लिंटन एन जी (Clinton N’Jie) याने डायनामो मॉस्को या संघाशी करार केला. रशियन प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी क्लिंटन एन जी हा डायनामो मॉस्को संघाशी चार वर्षांसाठी करारबद्ध झाला. तो आधी फ्रेंचच्या ऑलिम्पिक मर्सिल (Olympique Marseille) या संघाकडून खेळत होता. पण त्याने या संघाला सोडचिठ्ठी दिली आणि डायनामो मॉस्को संघाकडून नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

क्लिंटन एन जी जेव्हा आपल्या घरी होता, तेव्हा त्याला त्याच्या नव्या कराराबाबत खूप आनंद आणि उत्साह होता. त्याला त्याच्या या काराबाबतच्या बातम्या वाचण्याचा मोह आवरला नाही. आपण या करारामुळे बरेच चर्चच्या आहोत, तर गुगल वर आपले नाव सर्च करू या या उद्देशाने त्याने मोबाईलवर एक बटन दाबले. पण त्याच्या दुर्दैवाने ते बटण आणि ती वेळ दोन्हीही चुकीची ठरली. त्याने गुगलच्या जागी चुकून स्नॅपचॅट या सोशल अॅपचे लाईव्ह फिचर असलेले बटन दाबले आणि सेक्स करताना तो स्नॅपचॅटवर लाईव्ह झाला. त्यानंतर त्याने लगेचच ते लाईव्ह बंद केले.

या प्रकरणानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल संघाची आणि चाहत्यांची माफी मागितली. मी कराराचा आनंद साजरा करताना खूपच मद्यपान केले होते. मला माझ्या कराराबाबत बातमी वाचायला होती, पण अतिमद्यपानामुळे मी मोबाईलवर चुकीचे बटन दाबले, असे स्पष्टीकरण त्याने दिले.