फिफा विश्वचषक स्पर्धेला यंदा २० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम १८ डिसेंबरला खेळला जाईल. तत्पुर्वी टाईम्स नाऊच्या मते, कोझिकोडमधील सर्वात मोठा बूट फिफा विश्वचषकाचा भाग होण्यासाठी कोचीहून समुद्रमार्गे कतारला रवाना झाला आहे.
तसेच या सर्वात मोठ्या बुटाच्या अनावरणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक लोक कोझिकोड बीचवर गेले. हा बूट क्युरेटर एम. दिलीफ यांच्या टीमने आणि आयमॅक्स या भारतातील आघाडीच्या बिर्याणी तांदळाच्या कारखान्याच्या टीमने तयार केला आहे. या बूटाची लांबी १७ फूट आणि वजन ५० किलो आहे.
सर्वात मोठ्या या फूटबॉल बूटाचे अनावरण कालिकतचे उपमहापौर मुझफ्फर अहमद आणि केरळ संघाचे माजी कर्णधार आसिफ साहिर यांच्या करण्यात आले. आयोजकांना वाटते की, हा बूट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवेल.
केरळचे मंत्री अहमद डेव्हरकोविल म्हणाले, “फिफा विश्वचषकासाठी मल्याळी लोकांकडून ही भेट आहे.”
त्याचबरोबर मंजेरी येथील ब्राझिलियन फॅन क्लबचे सदस्य शाकीर म्हणाले, “विश्वचषक हंगाम हा नेहमीच एक असा हंगाम असतो. जिथे फुटबॉलचा उत्साह एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो आणि संपूर्ण जिल्हा आणि त्यातील लोक त्यात गुंतलेले असतात. लोक मलप्पुरमच्या स्टेडियममध्ये मोठ्या स्क्रीनवर सामना पाहतील, असे यावेळी होणार नाही. घडले. ते वेगळे असेल.”