जगप्रसिद्ध नियतकालिक ‘फोर्ब्स’ने २०१८तील जगभरातल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे. जाहीर झालेल्या टॉप १०० श्रीमंत खेळाडूंच्या यादीत केवळ एकाच भारतीय खेळाडूचा समावेश असल्याचे यावेळी दिसून आले. विशेष म्हणजे जाहीर झालेल्या  यादीमध्ये एकाही महिला खेळाडूचा समावेश नसल्याचे पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉप १०० मध्ये  भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचा समावेश असून तो यंदा ८३ व्या स्थानावर आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या यादीमध्ये तो ८९ व्या क्रमांकावर होता. ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या यादीनुसार, २०१८ मध्ये विराटची संपत्ती २४ मिलियन डॉलर एवढी आहे. या संपत्तीमध्ये त्याचे वेतन आणि अन्य कामकाजातून मिळालेल्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये ४० बास्केटबॉलपटूंचा समावेश असून यात १८ अमेरिकन फुटबॉलपटू आणि १४ बेसबॉलपटू आहेत. याव्यतिरिक्त फुटबॉलमधील ९, गोल्फमधील ५, मुष्ठीयुद्धातील ४, टेनिसमधील ४ आणि ऑटो रेसिंगमधील ३ खेळाडूंचा समावेश आहे. तसेच क्रिकेट, मिक्स्ड मार्शल आर्टस आणि ट्रॅक अॅण्ड फिल्ड या खेळातील प्रत्येकी १ खेळाडूंचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

यादीतील पहिल्या पाच जणांमध्ये या खेळाडूंचा समावेश –

पहिल्या स्थानावर विराजमान होण्याचा मान मुष्ठीयोद्धा फ्लॉयड मेवेदर याने पटकावला असून २०१८ या वर्षातील त्याची कमाई १९१३.३ कोटी रुपये आहे. तर फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (७४४.२कोटी) दुस-या स्थानावर आहे. फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनॉल्डो (७२४.२ कोटी), मिक्स्ड मार्शल आर्टस खेळाडू कोनॉर मेकग्रेगर (६६३.९ कोटी), फुटबॉलपटू नेमार (६०३.५ कोटी) हे अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forbes releases worlds 100 highest paid athletes
First published on: 06-06-2018 at 14:08 IST