भारतीय क्रिकेट संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जोनाथन एग्नेव यांनी खास प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव यांचे भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे योगदान असून त्यांनी वेगवान गोलंदाजीला ‘सेक्सी’ बनवले, असे एग्नेव यांनी सांगितले.
याआधीही अनेक क्रीडापंडितांनी आणि पत्रकारांनी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये असणाऱ्या कपिल देव यांच्याबाबत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता एग्नेव यांनाही कपिल देव यांची भूरळ पडली आहे. आयसीसीच्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी कपिलला भेटायचो, तेव्हा तो हास्य देत स्पर्धा करायचा. मला वाटते, की भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे सर्वात मोठे योगदान आहे. त्याने वेगवान गोलंदाजीला ‘सेक्सी’ बनवले आणि भारतीय क्रिकेटमध्ये एक नवे वळण आणले.”
Kapil Dev, India’s finest all-rounder, is considered as the true game-changer
We celebrate him on #ICCHallOfFame today.
More https://t.co/PzDGRwvlDH pic.twitter.com/AOeFiWMovc
— ICC (@ICC) May 24, 2021
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही कपिल देव यांचे कौतुक केले. तो म्हणाला, “४००हून अधिक विकेट्स, ५००० पेक्षा अधिक धावा आणि २५०हून अधिक वनडे विकेट्स. माझ्यासाठी ते खरे गेम चेंजर आहेत.” न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग म्हणाला, ”कपिल देव यांनी सर्वात कठीण परिस्थितीतही चांगली कामगिरी केली आणि म्हणूनच ते इतके महान खेळाडू बनले. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाचे शब्दात वर्णन करता येणार नाही. भारतामध्ये वेगवान गोलंदाज होणे सोपे नाही, पण कपिल देव यांनी केले. त्यांचे रेकॉर्ड्स त्यांची तंदुरुस्ती आणि क्षमता दाखवते. त्यांनी भारताला क्रिकेटच्या नकाशावर आणले.”
हेही वाचा – VIDEO : भारतातील ‘करोनानुभव’ सांगताना KKRच्या क्रिकेटपटूला झाले अश्रू अनावर