scorecardresearch

IPL History: ‘त्या’ दोन सामन्यांमध्ये युवराज सिंग चमकला; IPL मध्ये इतिहास रचत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी

Yuvraj Sing Sets Record In Indian Premier League : आयपीएलमध्ये हा अनोखा विक्रम नोंदवण्यात युवराज सिंग एकमेव गोलंदाज ठरला.

Yuvraj Singh IPL Records
IPL मध्ये युवराज सिंगच्या नावावर हा विक्रम नोंदवण्यात आला. (Image-Indian Express)

Yuvraj Sing Record In Indian Premier League : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलीय. एव्हढच नव्हे तर इंडियन प्रीमियर लीगमध्येही युवराजने धमाका केला आहे. युवराजने आक्रमक फलंदाजी करून गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. तसंच गोलंदाजीतही युवराजने अप्रतिम कामगिरी केली आहे. युवराजच्या भेदक गोलंदाजीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे युवराजच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आणि आयपीएलमध्ये हा विक्रम आजपर्यंत कोणत्याच खेळाडूने मोडला नाही.

आयपीएलच्या एका सीजनमध्ये घेतल्या २ हॅट्रिक; युवराज सिंग ठरला एकमेव गोलंदाज

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त ३ विकेट्सची हॅट्रिक भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्राच्या नावावर आहे. पण आयपीएलच्या एका सीजनमध्ये दोन हॅट्रिक घेण्याचा विक्रम फक्त युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने भेदक गोलंदाजी करून आयपीएलच्या एकाच सीजनमध्ये दोनवेळा विकेट हॅट्रिक घेतली आहे. षटकारांची हॅट्रिक मारणाऱ्या युवराज सिंगने गोलंदाजीतही कमाल केली आहे. २००९ मध्ये आयपीएल दरम्यान एक अनोखा विक्रम नोंदवण्यात आला. अमित मिश्रानंतर सर्वात जास्त आयपीएल हॅट्रिक घेणाऱ्या लिस्टमध्ये युवराज दुसऱ्या स्थानावर आहे.

नक्की वाचा – भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहची ‘IPL’ मध्ये धुलाई; ‘या’ खेळाडूंनी मैदानात पाडलाय चौकार-षटकारांचा पाऊस

‘त्या’ दोन सामन्यांमध्ये युवराजने घेतली होती हॅट्रिक

पंजाब टीमकडून खेळताना युवराजने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरच्या विरुद्ध पहिली हॅट्रिक घेतली. त्या सामन्यात युवराज सिंगने आरसीबीच्या जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा आणि मार्क बाऊचरला बाद करून विकेट हॅट्रिक घेतली होती. युवराजने आरसीबीसमोर २२-३ अशी जबरदस्त कामगिरी केली होती. आयपीएल २००९ दरम्यान युवराज सिंगने आयपीएल करिअरची दुसरी हॅट्रिक हैद्राबाद डेक्कन चार्जर्स विरोधात घेतली होती. युवराजने त्याच्या गोलंदाजीचा जलवा दाखवून डेक्कन चार्जर्सच्या हर्षल गिब्ज, एंड्र्यू सायमंड आणि वेणुगोपाल रावला बाद करत आयपीएलमध्ये दुसऱ्या विकेट हॅट्रिकवर नाव कोरलं. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या त्या सामन्यात युवराजने हैद्राबाद विरुद्ध १३-३ अशी अप्रतिम कामगिरी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या