Abdul Razzaq on Team India: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत नेहमीच सर्वाधिक उत्सुकता दिसून येते आहे. जेव्हा जेव्हा या दोन देशांत स्पर्धा सामना असतो, तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याने भारतीय गोलंदाज आणि फलंदाजाविरुद्ध पाकिस्तानची काय रणनीती असायची ते सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना अब्दुल रज्जाकने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असताना, त्यांचा संघ कोणत्या फलंदाजाविरुद्ध अधिक योजना आखत असे. त्याचबरोबर फलंदाजाची विकेट मिळाल्यावर जॅकपॉट लागल्यासारखे वाटायचे, याबाबत त्याने खुलासा केला. अब्दुल म्हणाला वीरेंद्र सेहवाग आणि नंतर सचिनचे नाव आघाडीवर असायचे.

या भारतीय फलंदाजांसाठी पाकिस्तान टीम योजना आखायची –

अब्दुल रज्जाकने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “पाकिस्तानी क्रिकेटपटू दिग्गज वीरेंद्र सेहवागच्या विरोधात योजना आखायचे. भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या विकेटला जॅकपॉट मानायचे.” रज्जाक पुढे म्हणाला, ‘वीरेंद्र सेहवाग हा सर्वात धोकादायक खेळाडू होता. त्यानंतर सचिन तेंडुलकर. पाकिस्तान सेहवाग आणि तेंडुलकरच्या विरोधात प्लॅनिंग करत असे. आमचा प्लॅन असा होता की या दोन विकेट्स (सेहवाग आणि तेंडुलकरच्या) मिळाल्या तर आम्ही सामना जिंकू.”

हेही वाचा – IPL 2023: गोविंदाचा जावई शाहरुख खानच्या केकेआर संघाचे नशीब चमकवणार! जाणून घ्या कोण आहे ‘तो’ क्रिकेटर?

झहीर खानविरुद्ध असायची योजना –

अब्दुल रज्जाक भारतीय गोलंदाजांबद्दल बोलताना म्हणाला, “आमचे फलंदाज झहीर खानविरुद्ध प्लॅनिंग करायचे. त्याचबरोबरइरफान पठाणवर काही काळ आणि हरभजन सिंग यांच्यावरही आमचे लक्ष्य असायचे. ही तीन मोठी नावे आहेत, ज्यांनी मोठे सामने खेळले आणि आपल्या देशासाठी चांगली कामगिरी केली.”

हेही वाचा – IPL 2023: गेलचा पहिल्या आयपीएल शतकाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘या’ खेळाडूने केली होती मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५२६ धावा केल्या आहेत. भारताचा माजी सलामीवीर सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०७१ धावा केल्या आहेत. मात्र, भारताचा माजी सलामीवीर सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये तेंडुलकरपेक्षा पाकिस्तानविरुद्ध जास्त धावा केल्या आहेत. सेहवागने पाकिस्तानविरुद्ध केवळ ९ कसोटी सामन्यांमध्ये ९१.१४च्या अविश्वसनीय सरासरीने १२७६धावा केल्या आहेत.