क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर गौतम गंभीर राजकारणात प्रवेश करणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. मात्र या सर्व घडामोडी अफवा असल्याचं गौतमने स्पष्ट केलं आहे. या सर्व गोष्टींची चर्चा कशी सुरु झाली याची मला काहीही कल्पना नसल्याचं गौतमने, मुंबई मिरर वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यंतरीच्या काळात गौतम गंभीर भाजपकडून दिल्लीतून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला गंभीर अनेक महिने सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत होता. गौतमचे विचार हे भाजपसाठी लाभदायक असल्याने त्याला दिल्लीतून लोकसभेचं तिकीट देण्याचा विचार सुरु होता. मात्र गौतमने या सर्व गोष्टी अफवा असल्याचं सांगत, चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir dismisses reports of joining politics
First published on: 07-12-2018 at 17:07 IST