शनिवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसाने व्यत्यय आणल्याने अनिर्णित राहिला. दरम्यान, स्टेडियममध्ये भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि प्रेक्षकांमध्ये खुन्नस पाहायला मिळाली. प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या नावाने घोषणाबाजी केल्याने गौतम गंभीरने थेट प्रेक्षकांना मधलं बोट दाखवलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गौतम गंभीर मोबाईलवर बोलत मैदानातून पॅव्हेलियनच्या दिशेनं जात होता. यावेळी काही प्रेक्षकांनी कोहलीच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली. या प्रकारामुळे चिडलेल्या गौतम गंभीरने प्रेक्षकांकडे पाहून मधलं बोट दाखवलं. प्रेक्षक आणि गौतम गंभीर यांच्यातील खुन्नसचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

विराट कोहलीच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये गौतम गंभीरला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापू्र्वीही विराटच्या चाहत्यांनी अनेकदा गंभीरला डिवचलं आहे. विशेष म्हणजे, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात मागील दशकभरात क्रिकेटच्या मैदानावर दोनदा वाद झाला आहे.

नुकतंच मे महिन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. दोघंही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. तेव्हापासून विराट कोहलीचे चाहते अनेकदा गौतम गंभीरला डिवचण्याचा प्रयत्न करतात.