बर्मिगहॅम : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीला ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. चीनच्या शू जिआन झांग आणि यू झेंग जोडीने भारतीय जोडीला २१-१७, २१-१६ असे नमविले. त्यामुळे ट्रीसा-गायत्री जोडीचे आव्हान संपुष्टात आले.

ट्रीसा-गायत्री जोडीने उपांत्य फेरीच्या सामन्यात चांगली सुरुवात केली. ते पहिल्या गेमच्या मध्यांतराला ११-८ असे आघाडीवर होते. त्यानंतर चीनच्या जोडीने आपला खेळ उंचावत गेम १५-१५ असा बरोबरीत आणला. मग त्यांनी चांगला खेळ कायम ठेवत पहिला गेम २१-१७ असा आपल्या नावे केला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने चीनच्या जोडीला टक्कर दिली. पण, चीनच्या झांग आणि झेंग जोडीने गेम २१-१६ असा जिंकत अंतिम फेरी गाठली. ट्रीसा-गायत्री जोडीला अंतिम फेरीत पोहोचता आले नसले, तरीही या प्रतिष्ठित स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ही दुहेरीतील पहिलीच भारतीय जोडी ठरली. त्यांनी उपउपांत्यपूर्व लढतीत ऑलम्पिक विजेत्या जोडीला नमवले, तर उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या जोडीला पराभूत केले होते.

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
Candidates Chess Tournament Alireza Firuza defeats D Gukesh sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील