गीता आणि बबिता या फोगट भगिनींवरील ‘दंगल’ हा चित्रपट धूमधडाक्यात सुरू असला तरी त्यांच्या आकस्मिक माघारीमुळे प्रो कुस्ती लीगमध्ये सहभागी झालेला उत्तर प्रदेश दंगल हा संघ अडचणीत सापडला आहे.

फोगट भगिनींवर उत्तर प्रदेशची मोठी मदार आहे. मात्र त्यांचाच सहभाग अनिश्चित झाल्यामुळे हा संघ तोंडघशी पडला आहे. बबिताला दुखापत झाली आहे, तर गीताच्या माघारीबाबत नेमके कारण कळू शकलेले नाही. काही

जण गीताला ताप आल्याचे सांगत आहेत तर काही जणांच्या मते तिलाही दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या खेळाडूंच्या माघारीमुळे उत्तर प्रदेशने त्यांच्याऐवजी नवीन

दोन खेळाडूंना सहभागी करून घेण्याबाबत भारतीय कुस्ती महासंघाकडे (डब्ल्यूएफआय) परवानगी मागितली आहे.

बबिताच्या जागी िपकीला संधी मिळण्याची शक्यता आहे तर गीताऐवजी मनीषाला स्थान मिळेल असा अंदाज आहे. मनीषाबरोबरच महाराष्ट्राची रेश्मा मानेचेही नाव चर्चेत आहे. एरवी ती जास्त वजनी गटात भाग घेत असते. तिला वजन कमी करण्यास सांगण्यात आले आहे. जर तिचे वजन ५८ किलोपेक्षा कमी झाले तर तिलाच प्राधान्याने संधी मिळण्याची शक्यता आहे.

‘‘गीता व बबिता यांनी स्पर्धेतून पूर्णपणे माघार घेतलेली नाही. अजूनही त्यांचे नाव संघाच्या यादीत आहे. मात्र स्पर्धेत त्या सहभागी होण्याची शक्यता कमीच आहे. बबिताच्या जागी पिंकीचे नाव निश्चित झाले आहे. गीताच्या जागी मनीषा व रेश्मा यांच्यापैकी एकाची वर्णी लागेल,’’ असे कुस्ती महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई महारथीविरुद्ध येथे शनिवारी झालेल्या सामन्याच्या वेळी गीता ही सहभागी झाली नाही. त्याऐवजी मनीषाला संधी देण्यात आली होती. मनीषाला सरिता देवीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. बबितानेही या लढतीत भाग घेतला नाही. हरयाणा हॅमर्सविरुद्धच्या लढतीत उत्तर प्रदेशकडून खेळताना बबिताला सोफिया मॅट्सनने अवघ्या ४६ सेकंदात चीत केले होते.