scorecardresearch

Premium

U 17 World Cup Football : अवुकूच्या गोलमुळे जर्मनीचा कोस्टा रिकाला धक्का

जर्मनीने कोस्टा रिकाला २-१ असे हरवले आणि कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार सलामी केली.

Live U 17 World Cup football
जॅन फिटे अर्प

सामन्याच्या ८९व्या मिनिटाला नोआह अवुकूने केलेल्या गोलमुळेच बलाढय़ जर्मनीने कोस्टा रिकाला २-१ असे हरवले आणि कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार सलामी केली.

जर्मनीने वरिष्ठ गटात अनेक वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. मात्र त्यांना कुमार गटात हे यश मिळवता आलेले नाही. यंदा हे विजेतेपद मिळवण्याच्या निर्धाराने जर्मनीचा संघ उतरला आहे. सामन्याच्या २१व्या मिनिटाला त्यांचा कर्णधार जॅन फिटे अर्पने खाते उघडले. पूर्वार्धात याच गोलाच्या आधारे त्यांनी आघाडी घेतली होती. परंतु ६४व्या मिनिटाला कोस्टा रिकाच्या आंद्रेस गोमेझने अप्रतिम गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. हा सामना याच बरोबरीत संपणार असे वाटत असतानाच ८९व्या मिनिटाला जर्मनीच्या नोआह अवुकूने सुरेख फटका मारला व संघाला २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्याने मारलेला फटका कोस्टा रिकाचा गोलरक्षक फर्नान फेरॉनला अडवता आला नाही.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: विराट कोहलीने मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेत विश्वचषकात रचला इतिहास, पाहा VIDEO
Asian Games 2023 I Have Lost My Medal to Transgender Women Swapna Burman Post Creates Angry Reaction Deletes In Hours
“तृतीयपंथी महिलेमुळे माझं पदक गेलं, याला..”, आशियाई क्रीडा स्पर्धेतील ‘स्वप्ना’ची पोस्ट; वाद चिघळताच बर्मनने..
Naseem Shah being ruled out of the World Cup due to injury
World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकचा वेगवान गोलंदाज नसीम शाह झाला भावूक, शेअर केली खास पोस्ट
World Cup 2023: Double blow for South Africa more players out of World Cup 2023 due to injury after Anrich Nortje
World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्का, ऑनरिक नॉर्खिया नंतर आणखी खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कप २०२३मधून बाहेर

बलाढय़ जर्मनीच्या खेळाडूंनीच या सामन्यात वर्चस्व गाजवले. जरी त्यांनी एक गोल स्वीकारला तरी त्यांच्या खेळाडूंनी सातत्याने चाली करीत नियंत्रण राखले होते. गोल करण्याच्या अचूकतेअभावी त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले.

क गट

जर्मनी                                                     कोस्टा रिका

२                                                                 १

जॅन फिटे अर्प २१’                                    आंद्रेस गोमेझ ६४’

नोआह अवुकू ८९’

 

 

 

 

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Germany beat costa rica in football fifa u17 world cup

First published on: 08-10-2017 at 01:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×