Shoaib Akhtar statement on Champions Trophy Controversy : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान आहे, परंतु ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली जाण्याची अपेक्षा आहे. पीसीबीनेही काही अटींसह हे मान्य केले आहे. पीसीबीने भारतात होणाऱ्या आयसीसी कार्यक्रमांसाठी उच्च महसूल वाटा आणि हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याची मागणी केली आहे. यावर शोएब अख्तर म्हणाला आहे की पीसीबीची मागणी ठीक आहे, पण पाकिस्तानने भारतात जाऊन तिथेच त्यांना पराभूत करुन यायला हवे.

शोएब अख्तर काय म्हणाला?

शोएब अख्तर पाकिस्तानच्या टी.व्ही चॅनेलवर म्हणाला, “तुम्हाला होस्टिंग अधिकार आणि कमाईसाठी पैसे मिळत आहेत. हे हे ठीक आहे. आम्ही हे समजू शकतो आणि पाकिस्तानची भूमिकाही योग्य आहे. त्यांनी भक्कम स्थिती निर्माण करायला हवी होती, का नाही? एकदा आम्ही आमच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यास सक्षम झालो आणि ते यायला तयार नसतील तर त्यांनी आमच्यासोबत महसूल वाटून घ्यावा. हा एक चांगला निर्णय आहे.”

आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा – शोएब अख्तर

पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा, असे मत शोएब अख्तर आहे. पण, त्यांनी आपला संघाची अशा प्रकारे बांधणी केली पाहिजे की, जो भारताला त्यांच्याच घरात पराभूत करू शकेल. तो म्हणाला, “भविष्यात भारतात खेळण्याच्या दृष्टीने आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि तिकडे जायला हवे. माझा विश्वास नेहमीच राहिला आहे, भारतात जा आणि तिथे त्यांना हरवा. भारतात खेळा आणि तिथेच त्यांना चीतपट करुन या. मला वाटते की, हायब्रीड मॉडेलवर आधीच स्वाक्षरी झाली होती.”

हेही वाचा – Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालच्या हेल्मेटवर वेगवान बाऊंसर आदळल्यानंतर गोलंदाजाने दिली खुन्नस, बाचाबाचीचा VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा –

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आयसीसीची बैठक होऊनही अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही. असे मानले जाते की जर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली गेली, तर भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल. याशिवाय जर तो उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्याचे सामने पुन्हा यूएईमध्ये होतील.