पीटीआय, अहमदाबाद

गुजरात टायटन्स संघाला ‘प्ले-ऑफ’ मध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा कायम ठेवायच्या असल्यास त्यांना गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सोमवारी होणाऱ्या ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.

Vinesh Phogat Appeal Rejection by CAS Bajrang Punia Post Goes Viral
Vinesh Phogat: ‘१५-१५ रूपयांत मेडल खरेदी करा…’ विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची धक्कादायक पोस्ट, पीटी उषानेही सुनावलं
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Neeraj chopra mother wins hearts after Olympic final
Neeraj Chopra Mother: सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…
IND vs SL Mohammed Siraj Kusal Mendis Controversy
IND vs SL 3rd ODI : सिराज-मेंडिस यांच्यात लाइव्ह मॅचमध्ये जुंपली, एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO व्हायरल
Paris Olympics 2024 Nishant Dev Coach Statement on QF Umpire Decision
Paris Olympics 2024: निशांत देवच्या सामन्यात पंचांनी दिला चुकीचा निर्णय? कोचचं वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्टनंतर चर्चेला उधाण, नेमकं काय घडलं?
Paris Olympics 2024 Taapsee Pannu Husband Mathias Boe Retirement From Badminton Coaching
Paris Olympics 2024: तापसी पन्नूच्या पतीने भारताच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, ऑलिम्पिकमधून हे दोन खेळाडू बाहेर झाल्याने घेतला मोठा निर्णय
Who is Karnam Malleswari
Karnam Malleswari : भारताच्या पहिल्या महिला ऑलिम्पिक विजेत्या कोण? कोणत्या पदकावर कोरलं होतं देशाचं नाव?
Carini abandoned her bout against Khelif
विश्लेषण: महिलांच्या विभागात ‘पुरुष’ बॉक्सर? ऑलिम्पिकमध्ये या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काय आहे?

गिलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या गेल्या सामन्यात शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्याच्याशिवाय साई सुदर्शननेही शतकी खेळी केली. ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवायचे झाल्यास या दोन्ही खेळाडूंना कोलकाताविरुद्धही चमक दाखवावी लागेल. सध्या सात संघ ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीत आहेत. सनरायजर्स हैदराबाद चौथ्या तर, चेन्नई सुपर किंग्ज (१४ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे १२ गुण झाले असून ते पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. त्यातच दिल्ली कॅपिटल्स व लखनऊ सुपर जायंट्स संघाचे समान १२ गुण आहेत. गुजरातचे १० गुण आहेत. गुजरातची निव्वळ धावगती चांगली आहे. मात्र, गुजरातला विजय मिळवण्यासह इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागेल.

हेही वाचा >>>RCB vs DC : रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने नोंदवला सलग पाचवा विजय, ४७ धावांनी उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा

नरेन, सॉल्टवर भिस्त

कोलकाता संघाचा प्रयत्न आपले अग्रस्थान आणखी भक्कम करण्याचा राहील. त्यांना सुरुवातीच्या दोन संघांमध्ये राहण्यासाठी केवळ एकच विजय आवश्यक आहे. कोलकाताने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला १८ धावांनी नमवत ‘प्ले-ऑफ’मधील आपले स्थान निश्चित केले होते. कोलकातासाठी सुनील नरेनने ४६१ धावा केल्या असून १५ गडी देखील बाद केले आहेत. यासह आंद्रे रसेलने २२२ धावा करण्यासोबत १५ बळी मिळवले आहेत. लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने १८ बळी मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे सलामीवीर फिल सॉल्ट नरेनसह संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न करतील. यासह कर्णधार श्रेयस अय्यर व रिंकू सिंहकडूनही संघाला अपेक्षा असतील.

रशीद, मोहितकडून अपेक्षा

गुजरातच्या गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या गोलंदाजांमध्ये सातत्यपणाचा अभाव आहे. तर, फिरकीपटू अधिक धावा देताना दिसत आहेत. त्यामुळे अनुभवी मोहित शर्मा व रशीद खान यांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. नूर अहमदच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष राहील. संदीप वॉरियर व कार्तिक त्यागी यांना संधी मिळाल्यास योगदान द्यावे लागेल. गुजरातच्या फलंदाजांना या सामन्यात चमक दाखवावी लागेल. गेला सामना सोडल्यास त्यांच्या शीर्ष फळीतील फलंदाजांना चमक दाखवता आली नव्हती. गिल व सुदर्शनने गेल्या सामन्यात पहिल्या गड्यासाठी २१० धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. मात्र, संघातील डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा आणि राहुल तेवतिया यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.