मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू गुरबाज सिंगला आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात दोन वर्षांनंतर पुनरागमनाची संधी मिळाली आहे. ३१ मेपासून हेग (नेदरलँड्स) येथे सुरू होणाऱ्या या स्पध्रेसाठी भारताच्या १८ खेळाडूंची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे सरदारा सिंगकडेच कर्णधारपद ठेवण्यात आले असून, फुलबॅक खेळाडू रुपींदरपाल सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारताला विश्वचषक स्पर्धेसाठी ‘अ’ गटात स्थान देण्यात आले असून त्यांना ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, इंग्लंड, स्पेन, मलेशिया व बेल्जियम यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या सलामीच्या लढतीत

भारतापुढे बेल्जियमचे आव्हान असणार आहे.
भारतीय संघ
सरदारा सिंग (कर्णधार), गोलरक्षक : पी.आर.श्रीजेश, हरज्योतसिंग, बचाव फळी : गुरबाजसिंग, रुपींदरपाल सिंग, व्ही. आर. रघुनाथ, बीरेंद्र लाक्रा, कोठाजित सिंग, मनप्रित सिंग. मधली फळी : एस. के. उथप्पा, धरमवीर सिंग, जसजित सिंग, चिंगलेनासाना सिंग. आघाडीची फळी : एस. व्ही. सुनील, रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, निक्कीन थिमय्या, मनदीप सिंग.