Harbhajan Singh doesn’t understand why Rahane and Pujara were dropped : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात खराब प्रदर्शन केले. या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने संघातील युवा खेळाडूंवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. ज्यामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या कसोटी क्रिकेटमधील बड्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. यावर आता टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे.

पुजारा-रहाणेला वगळण्यावर भज्जीने प्रश्न उपस्थित केला –

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “रहाणे आणि पुजाराला कसोटी संघातून का वगळण्यात आले, हे मला समजत नाही. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी सर्वत्र धावा केल्या आहेत. जर आपण मागील विक्रमांबद्दल बोललो, तर पुजाराने विराट कोहलीइतकेच योगदान दिले आहे. तरीही पुजाराला संघातून वगळण्यात आले, जे मला समजू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा चांगला फलंदाज आमच्याकडे नाही.”

हरभजन सिंग पुढे म्हणाला, “तीन दिवसांत भारत एका क्षणासाठीही सामन्यात दिसला नाही. पहिल्या डावात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या आणि हे सर्व केएल राहुलचे आभार आहे. त्याने शानदार खेळी खेळून भारताची धावसंख्या २४५ धावांपर्यंत नेली. भारताला दुसऱ्या डावात केवळ १३१ धावा करता आल्या. यामध्ये जर विराट कोहलीचे योगदान नसते, तर ते आणखी कठीण झाले असते. पहिल्या डावातील भारताच्या कामगिरीवर या सामन्याचा निर्णय झाला.”

हेही वाचा – IND vs SA Test : ‘तिसऱ्या दिवशी भारताकडून सामन्यात…’, आकाश चोप्राने टीम इंडियाच्या पराभवावर उपस्थित केले प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही २०२३ च्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सहभागी झाले होते. या मालिकेनंतर या दोघांनाही कसोटी संघातून वगळण्यात आले. या दोन्ही खेळाडूंनी परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय संघासाठी महत्त्वाच्या प्रसंगी अनेक चमकदार खेळी खेळल्या आहेत.