Harbhajan Singh Tweet About KL Rahul: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत, तरीही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. याबाबत क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला संघातून बाहेर काढण्याबाबत बोलत आहेत, तर दुसरीकडे त्याच्या समर्थनासाठी जोरजोरात आवाज उठवला जात आहे. आता माजी क्रिकेटर हरभजन सिंगने एक ट्विट करून केएल राहुलला एकटे सोडण्याचे आवाहन केले आहे.

हरभजन सिंगने केएल राहुलला अशा प्रकारे दिली साथ –

केएल राहुल हा एकदिवसीय आणि टी-२० मध्ये चमकदार खेळाडू आहे, पण कसोटीत त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. असे असूनही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी देण्यात आली, ज्यात तो अपयशी ठरला. या खराब कामगिरीनंतर त्याच्या जागी अन्य चांगल्या खेळाडूला संधी देण्याची मागणी अनेकांकडून होत आहे. त्याचवेळी या वादात हरभजन सिंगने राहुलचे समर्थन करत ट्विट करत सर्वांची बोलती बंद केली आहे.

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

तुमचाच भारतीय खेळाडू आहे हे लक्षात घ्या –

हरभजनने ट्विट केले की, “आपण केएल राहुलला एकटे सोडू शकतो का? त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. तो अजूनही मोठा खेळाडू आहे. तो जोरदार पुनरागमन करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अशा टप्प्यांमधून जातो. तो पहिला नाही आणि शेवटचा नाही. त्यामुळे तो तुमचाच भारतीय खेळाडू आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवा.”

मर्यादित षटकांच्या क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलला त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी करता आलेली नाही. आता त्याने सर्व फॉरमॅटचे उपकर्णधारपदही गमावले आहे. केएल राहुलने गेल्या तीन डावात २०, १७ आणि १ धावा केल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. १ मार्चपासून सुरू होणार्‍या कसोटी सामन्याला बराच काळ बाकी आहे. या कालावधीत स्वत:मध्ये केएल राहुलला बदल करुन जबाबदारी स्वीकारण्याची संधी आहे.

हेही वाचा – Venkatesh Akash Debate: केएल राहुलबद्दल दिग्गजांमधील वाद पोहोचला शिगेला; आकाश चोप्राचे ‘हे’ ओपन चॅलेंज व्यंकटेश प्रसादने धुडकावले

केएल राहुलची कसोटी कारकीर्द –

केएल राहुलच्या कसोटी कारकिर्दीला नऊ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवात झाली होती. २०१४ ते २०२३ पर्यंत त्याने ४७ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने ३३.४४ च्या सरासरीने २६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान राहुलने ७ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत पहिल्या दोन सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ ३८ धावा आल्या आहेत आणि ही चिंतेची बाब आहे.