सध्या टीम इंडियाबाहेर असणारा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने मुलगा अगस्त्य संबंधित एक नवा टॅटू (tattoo) काढला आहे. त्याने एका इंस्टाग्राम पोस्टवरून ही माहिती दिली आहे. हार्दिकने आपल्या उजव्या हातावर हा टॅटू बनवला असूत यात त्याने आपल्या मुलाची जन्मतारीख ३० जुलै २०२० ही लिहिली आहे. यासोबतच या टॅटूमध्ये त्याने स्वतःचा आणि मुलाचा एक फोटोही काढला असून यात त्याने अगस्त्यचा हात पकडला आहे.

अलीकडेच हार्दिकने भारतीय निवड समितीला सांगितले होते, की त्याला पुढील मालिकेसाठी निवडू नये. हार्दिकला त्याच्या गोलंदाजीवर आणि त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यानंतरच तो टीम इंडियात पुनरागमन करेल.

हेही वाचा – IND vs NZ : विराट बाद की नाबाद? पंचांच्या वादग्रस्त निर्णयावरून सोशल मीडियावर उठलं वादळ; इंग्लंडचा वॉन म्हणतो…

मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएलसाठी चार खेळाडूंना कायम ठेवले, पण पंड्या बंधुंना वगळले. या चार खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. आयपीएल २०२२साठी मुंबई इंडियन्सला कायम न ठेवल्यानंतर हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली. २०१५ मध्ये फ्रेंचायझीमध्ये सामील झाल्यानंतर हार्दिक पहिल्यांदाच मुंबई संघाबाहेर गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषकापूर्वी, आयपीएलमध्ये पंड्याच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवण्यात आले होते, परंतु स्पर्धेच्या दोन्ही टप्प्यांतील एकाही सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. २०१९ मध्ये त्याने आयपीएलमध्ये शेवटची गोलंदाजी केली होती आणि तो २०२०चा हंगाम फलंदाज म्हणून खेळला होता. फिटनेसमुळे पांड्याला न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन टी-२० मालिकेसाठी संघात निवडण्यात आले नाही आणि आता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याचाही भाग नसल्याचे समोर आले आहे.