Hardik Pandya With Agastya Viral Video : भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी १८ जुलै रोजी दोघांनीही एक निवेदन जारी करुन घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. या दोघांनाही अगस्त्य नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर अगस्त्य आई नताशाबरोबर राहत होता. आता घटस्फोटानंतर पहिल्यांदाच हार्दिक पांड्याने अगस्त्याची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्याबरोबर त्याचा चार वर्षांचा मुलगा अगस्त्य आणि त्याचा पुतण्याही आहे. हे दोघेही हार्दिक पांड्याबरोबर खेळताना दिसत आहेत. आजूबाजूला अनेक सुरक्षा रक्षक असून तिघांच्याही चेहऱ्यावर प्रचंड हास्य दिसतंय.

तसंच, हार्दिक पंड्यानेही एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये अगस्त्य, कृणाल पांडेचा मुलगा, आणि काही कुत्रे आजूबाजूला आहेत. मुंबईतील त्याच्या जिममधील हा फोटो आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटानंतर नताशा सर्बियाला परत गेली होती. परंतु, आता काही दिवसांपूर्वी ती पुन्हा मुंबईत दाखल झाली. त्यामुळे नताशा आणि अगस्त्य यांची भेट होऊ शकली.

हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक या दाम्पत्याचा घटस्फोट काही महिन्यांपूर्वीपर्यंत प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. टी २० वर्ल्डकपदरम्यानही हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. सुरुवातीला या दोघांकडून घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, अखेर जुलै महिन्यात दोघांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. बरीच चर्चा, शंका-कुशंका, तर्क-वितर्कांना खतपाणी मिळाल्यानंतर अखेर हार्दिक पंड्या व नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला. दोघांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली होती. तसेच, या काळात आपल्या खासगी आयुष्याचा लोकांनी आदर राखावा व आपल्या पाठिशी राहावं अशी विनंतीही त्यांनी चाहत्यांना व आप्तस्वकीयांना केली होती. त्यानंतर जवळपास महिनाभर या दोघांकडून एकमेकांबाबत किंवा त्यांच्यातील नात्याबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नव्हतं.

हेही वाचा >> Hardik Pandya : घटस्फोट आणि कर्णधारपदाच्या हुलकावणीनंतर हार्दिकची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कधीकधी मन…’

हार्दिक नताशाने घटस्फोट का घेतला?

दरम्यान, नताशानं हार्दिक पंड्याशी घटस्फोट का घेतला? याची कारणंच तिनं तिच्या पोस्टमध्ये सूचित केली आहेत, असं आता बोललं जात आहे. हार्दिक पंड्याच्या दिखाऊ आणि स्वकेंद्रीत वृत्तीशी नताशा जुळवून घेऊ शकली नाही असं या दाम्पत्याच्या काही जवळच्या लोकांनी टाईम्स नाऊला सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिकच्या नव्या अफेअरच्या चर्चा!

दरम्यान, नताशाशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पंड्या ब्रिटिश गायिका जॅस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. हार्दिक पंड्या व जॅस्मिन वालिया या दोघांच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सवरून काही युजर्सनं ते दोघे ग्रीसमध्ये एकत्रच सुट्टी घालवत असल्याचे तर्क बांधायला सुरुवात केली आहे. मात्र, या दोघांकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.