Who is Jasmin Walia: भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी गेल्या महिन्यात १८ जुलै रोजी दोघांनीही एक निवेदन जारी करुन घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. हार्दिक आणि नताशा यांच्यात काय झाले हे अद्याप उघड झाले नसले, तरी नताशाच्या फसवणुकीच्या पोस्ट लाइक केल्यानंतर क्रिकेटरने तिची फसवणूक केली असावी अशी अफवा पसरली होती. या बातमीनंतर लगेच म्हणजेच घटस्फोटाची पुष्टी झाल्यानंतर २५ दिवसांनी हार्दिक पंड्या पुन्हा प्रेमात पडला असून एका गायिकेला डेट करत असल्याची चर्चा आहे.

नताशापासून वेगळे झाल्यानंतर हार्दिक कोणाला डेट करत आहे?

सध्या नताशा आपल्या मुलासोबत सर्बियामध्ये तिच्या पालकांच्या घरी आहे. दरम्यान, हार्दिक क्रिकेटमधून ब्रेक घेऊन ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या हार्दिक पंड्याने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण सोशल मीडिया युजर्सना असे काहीसे लक्षात आले आहे, ज्यानंतर तो आपल्या नवीन लेडी लव्हसोबत इथे सुट्टी घालवत असल्याचा त्यांना संशय आहे.

कोण आहे जास्मिन वालिया?

वास्तविक, हार्दिक पंड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा, फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येऊ लागल्यानंतर सुरु झाल्या आहेत. हार्दिक आणि जास्मिन दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवताना दिसत असल्याची चर्चा चाहते आणि नेटीझन्स करत आहेत. हार्दिक आणि जास्मिनने इन्स्टाग्रामवर एकाच स्विमिंग पूलमधधून फोटो शेअर केल्यावर चर्चांना उधाण आले आहे. दोघांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडाओच्या बॅकग्राऊंडला एकच ग्रीक व्हॅली दिसत आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगटची प्रतीक्षा पुन्हा वाढली… आता रौप्यपदकासाठीचा क्रीडा लवादाचा निर्णय ‘या’ दिवशी येणार

जास्मिनने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट केला होता. ज्यावर तिने निळ्या रंगाचा शर्टही घातला होता. ती पूलजवळ स्टायलिश पोज देताना दिसली. ती स्ट्रॉ हॅट आणि ओव्हरसाईज सनग्लासेस घातलेली दिसत आहे. यानंतर काही वेळातच हार्दिकने त्याच स्विमिंग पूलच्याभोवती फिरतानाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला. व्हिडिओमध्ये, हार्दिक क्रीम रंगीत पँट, पॅटर्नचा शर्ट आणि सनग्लासेसच्या आरामदायक पण फॅशनेबल पोशाखात दिसत आहे.

हेही वाचा – Team India : BCCI ने भारताच्या वेळापत्रकात केला मोठा बदल, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धची मालिका कधी होणार?

जास्मिनने हार्दिकच्या व्हिडिओला केले लाइक –

View this post on Instagram

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्मिन आणि हार्दिकच्या पोस्टमागील एकच बॅकग्राऊंड पाहून चाहते दोघे डेट करत असल्याचा अंदाज बांधत आहेत. इतकेच नाही तर जास्मिनने हार्दिकच्या व्हिडिओला लाइक केल्याने चाहत्यांचा अंदाज आणखी पक्का झाला आहे. जास्मिनच्या बिकिनी पोस्टवर हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, क्रिकेटरने जास्मिनचे अलीकडील सर्व फोटो लाईक केले आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात, यामुळे चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.