Harmanpreet Kaur injured during IND W vs PAK W match video viral : महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या भक्कम गोलंदाजीसमोर पाकिस्तान संघाला ८ विकेट्सवर केवळ १०५ धावा करता आल्या. भारतासाठीही लक्ष्य गाठणे सोपे नव्हते. अखेरीस कर्णधार हरमनप्रीत कौरच्या २९ धावांच्या खेळीने संघाला विजयापर्यंत नेले. भारतीय संघ विजयापासून अवघ्या २ धावा दूर असताना हरमनप्रीतला दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार खेळी साकारत भारताला संकटातून बाहेर काढत संघाला विजयाच्या जवळ आणले होते. मात्र, सामना संपण्यापूर्वीच तिला दुखापत झाली आणि तिला मैदान सोडावे लागले. तिने २४ चेंडूत १ चौकार मारून २९ धावांची खेळी खेळली आणि रिटायर्ड हर्ट झाली. ज्यामुळे तिला मैदान सोडावे लागले. कर्णधार आऊट झाल्यानंतर सजीवन सजना क्रीझवर आली आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

हरमनप्रीत कौरला कशी झाली दुखापत –

भारताच्या डावातील १८ व्या षटकातील निदा दारचा पाचवा चेंडू खेळताना कर्णधार हरमनप्रीतचा शॉट चुकला. ती शॉट खेळण्यासाठी क्रीजच्या बाहेर गेली होती, त्यामुळे तिला आपली विकेट वाचवण्यासाठी क्रीजच्या यायचे होते. त्यामुळे हरमनप्रीतने पाय मागे सरकवून विकेट वाचवली, पण यादरम्यान पाय ताणले गेल्याने खाली पडली आणि तिच्या मानेला दुखापत झाली. यानंतर लगेच तिथे फिजिओ आले. काही वेळाने ती उभी राहिली तेव्हा तिने तिची मान पकडली होती. तिला मानेचा त्रास जाणवत असल्याने मैदान सोडण्यचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Richa Ghosh : रिचा घोषने एका हाताने उत्कृष्ट झेल टिपत वेधलं सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघ विजयानंतर चौथ्या स्थानावर पोहोचला –

अ गटातील गुणतालिकेवर नजर टाकली तर भारतीय संघ या विजयासह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात दोन गुण आहेत. तथापि, त्याचा निव्वळ धावगती -१.२१७ आहे. आता भारतीय संघाला ९ ऑक्टोबरला याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर या पराभवाचा पाकिस्तानवर फारसा परिणाम झालेला नाही. फातिमा सनाचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत आणि निव्वळ धावगती +०.५५५ आहे. न्यूझीलंड अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.