Harry Brook Viral Video: इंग्लंडचा संघ हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक संघांपैकी एक आहे. या संघात एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात

इंग्लंडने १४६ धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांअखेर ३०४ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेला १५८ धावा करता आल्या.

इंग्लंडकडून फलंदाजी करताना फिल सॉल्टने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ६० चेंडूंचा सामना करत ८ षटकार १५ चौकारांच्या साहाय्याने १४१ धावांची वादळी खेळी केली. त्याला साथ देत जोस बटलरने अवघ्या ३० चेंडूत ८३ धावांची खेळी केली. शेवटी जेकब बेथलनेही १४ चेंडूत २६ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रूकने २१ चेंडूत ४१ धावा चोपून काढल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. त्याचा हा एकमेव षटकार खास ठरला. त्याने मारलेल्या या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हॅरी ब्रूकचा भन्नाट शॉट

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४१ धावांची स्फोटक खेळी केली. यादरम्यान त्याने विलियम्सच्या गोलंदाजीवर भन्नाट शॉट मारला. विलियम्सने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर हॅरी ब्रूकने ऑफ स्टंपच्या बाहेर पाय काढला आणि मिड विकेटच्या वरून खणखणीत षटकार मारला. हा भन्नाट शॉटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतआहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून फिल सॉल्टने १४१ धावांची तुफानी खेळी केली. तर जॉस बटलरने ८३ धावांची स्फोटक खेळी केली. तर जेकब बेथलने २६ धावांची खेळी केली. शेवटी हॅरी ब्रूकने नाबाद ४१ धावा केल्या. इंग्लंडने २० षटकांअखेर २ गडी बाद ३०४ धावा केल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मारक्रमने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. दरम्यान दक्षिण आफ्रिकेला २० षटकांअखेर अवघ्या १५८ धावा करता आल्या. यासह इंग्लंडने हा सामना १४६ धावांनी आपल्या नावावर केला.