दिव्यांग गटात प्रथमेश भोसले तर मास्टर्स गटात संतोष ठोंबरेची बाजी

बॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारीने कनिष्ठ ‘मुंबई-श्री’चा किताब पटकावला. ६० किलो वजनी गटातील हेमंतने आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या सर्व खेळाडूंना मागे टाकले. दिव्यांग गटाच्या ‘मुंबई-श्री’मध्ये माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले अव्वल ठरला, तर मास्टर्स गटात संतोष ठोंबरे, मोहम्मद शेख आणि मुकुंद लांडगे आपापल्या गटात अव्वल ठरले.

कनिष्ठ ‘मुंबई-श्री’चा निकाल

  • ५५ किलो वजनी गट : १. प्रशांत सडेकर, २. वृषभ राणे, ३. नंदन नरे; ६० किलो : १. हेमंत भंडारी, २. अमेय नेवगे, ३. अमित यादव; ६५ किलो : १. गिरीश मुठे, २. प्रशांत गुजन, ३. अक्षय काटकर; ७० किलो : १. अक्षय खोत, २. कुशल सिंग, ३. करण कोटियन; ७५ किलो : १. योगेश मोहिते, २. आकाश वाघमारे, ३. अरनॉल्ड डिमेलो; ७५ किलोवरील : १. नितीन कोळी, २. शेख मोहम्मद इब्राहिम, ३. निखिल राणे (बालमित्र).
  • दिव्यांग ‘मुंबई-श्री’ : १. प्रथमेश भोसले, २. मोहम्मद रियाझ, ३. मेहबूब शेख.
  • नवोदित मुंबई फिटनेस फिजिक : १. कौस्तुभ पाटील, २. यज्ञेश भुरे, ३. भाग्येश पाटील.
  • मास्टर्स मुंबई श्री : वय वर्षे ४० ते ५० (७० किलो वजनी गट) : १. संतोष ठोंबरे, २. सुनील सावंत, ३. दत्ताराम कदम (जय भवानी); वय वर्षे ४० ते ५० (७० किलोवरील) : १. मोहम्मद शब्बीर शेख, २. वीरेश धोत्रे, ३. जीतेंद्र शर्मा; वय वर्षे ५०वरील खुला गट : १. मुकुंद लांडगे, २. दत्तात्रय भट, ३. विष्णू देशमुख.