जम्मू आणि काश्मीरकडून मानहानीकारक पराभव झाल्यानंतर रेल्वे आणि उत्तर प्रदेशविरुद्ध होणाऱ्या आगामी दोन सामन्यांसाठी मुंबईच्या संघात मधल्या फळीतील फलंदाज हिकेन शाहची निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी राखीव खेळाडू म्हणून बोलावण्यात आल्याने तो या सामन्यांसाठी मुंबईच्या संघात नसेल.
याचप्रमाणे मुंबईचा अनुभवी फलंदाज वसिम जाफरला दुखापत झाल्यामुळे तोसुद्धा या सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. मुंबईचा १४ ते १७ डिसेंबर दरम्यान रेल्वेविरुद्ध सामना होईल, तर उत्तर प्रदेशविरुद्ध २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत सामना होणार आहे. मुंबईचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक नायर (उपकर्णधार), आदित्य तरे, हिकेन शाह, ब्रविश शेट्टी, प्रफुल्ल वाघेला, श्रेयस अय्यर, सुशांत मराठे, केव्हिन अल्मेडा, विशाल दाभोळकर, अक्षय गिरप, शार्दूल ठाकूर, जावेद खान, बद्रे आलम आणि क्षेमल वायंगणकर. प्रशिक्षक : प्रवीण अमरे.