HS Prannoy lost to China’s Wang Hong Yang in Australia Open Super 500: रविवारी ऑस्ट्रेलिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या एचएस प्रणॉयला पराभव पत्कारावा लागला. त्याच्याविरुद्ध चीनच्या वांग हाँग यांगने तीन गेमच्या थ्रिलरचा सामना जिंकला. प्रणॉयला या वर्षीची दुसरी बीडब्ल्यूएप ५०० स्पर्धा जिंकण्याची संधी होती, पण तो जिंकू शकला नाही. जागतिक क्रमवारीत २४व्या क्रमांकाच्या वांगकडून प्रणॉयला ९-२१, २३-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला.

प्रणॉयला आघाडीचा फायदा उठवता आला नाही –

केरळचा राहणारा ३१ वर्षीय प्रणॉय पहिला गेम २१-९ असा गमावला. या सामन्यात वाँगचे पूर्ण वर्चस्व होते. यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्याने चांगले पुनरागमन केले. दुसरा गेम थ्रिलर होता आणि प्रणॉयने तो २३-२० असा जिंकला. शेवटच्या गेममध्ये प्रणॉयने १९-१४ अशी आघाडी घेतली पण इथून संपूर्ण सामना फिरला. वांगने जोरदार पुनरागमन करत स्कोअर २०-२० पर्यंत आणला. त्यानंतर पुढील दोन गुण घेत त्याने विजेतेपद पटकावले.

IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Rohit sharma becomes first Indian player to win 250 T20
Rohit Sharma Records: रोहित शर्माच्या नावे अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला
Jos Buttler's century in 100th match,
RR vs RCB : बटलरने शतक झळकावून केएल राहुलच्या विक्रमाशी साधली बरोबरी, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

वांग हाँग यांगने मागच्या स्पर्धेतील घेतला बदला –

याआधी या भारताचा एचएस प्रणॉयला आणि चीनचा वांग हाँग यांग यांच्यात एकच सामना झाला होता. त्या सामन्यात प्रणॉयने तीन गेममध्ये विजय मिळवत मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. मात्र, यावेळी वांग हाँग यांगने एचएस प्रणॉयला पराभूत करत मागील पराभवाचा बदला घेतला.

हेही वाचा – Asia Cup 2023; आशिया चषक स्पर्धेच्या सर्व मॅचेसचे टायमिंग जाहीर, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामने?

एचएस प्रणॉयने प्रियांशूला केले होते पराभूत –

मे महिन्यात मलेशियन मास्टर्स सुपर ५०० जिंकणाऱ्या ३१ वर्षीय प्रणॉयने शनिवारी देशबांधव प्रियांशू राजावतचा पराभव केला होता. त्याने ऑस्ट्रेलिया ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रियांशू राजावतचा २१-१८, २१-१२ असा पराभव केला. अतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर एचएस प्रणॉय म्हणाला, “बरेच श्रेय मला जाते. कारण मी बदल स्वीकारण्यास आणि नवीन गोष्टी करून पाहण्यास तयार होतो. मी ज्या टीमसोबत काम करत आहे ती खरोखरच अद्भुत आहे. सरावाच्या वेळी ते मला दररोज मदत करतात.”