नैरोबी : जागतिक युवा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत (२० वर्षांखालील) गुरुवारी रोहन कांबळेच्या कामगिरीने भारतीय चाहत्यांना दिलासा दिला. रोहनने पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत उपांत्य फेरी गाठून पदकाच्या आशा कायम राखल्या आहेत. रोहनने ५५.०० सेकंद अशी वेळ नोंदवताना पाचव्या फेरीत चौथे स्थान मिळवले. हरदीप कुमारने १:१२.८० मिनिट वेळ नोंदवल्यामुळे तो उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनू कुमारला (१:५०.२६ मि.) पाचव्या स्थानी समाधान मानावे लागल्याने त्याची उपांत्य फेरीची संधी हुकली. थाळीफेकीत अमनदीप सिंगची थेट १२व्या स्थानी घसरण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hurdler rohan kamble books semifinal berth in u 20 world athletics championships zws
First published on: 20-08-2021 at 01:45 IST