अर्जेंटिनाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मॅरेडोना यांच्या निधनामुळे समस्त क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर मॅरेडोना यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. मॅरेडोना यांचे चांगले मित्र असलेल्या पेले यांनीही आपल्या मित्राच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पेले यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. किती दुर्दैवी बातमी आहे. मी माझा एक चांगला मित्र गमावला आणि जगाने एक महान खेळाडू. खूप काही बोलण्यासारखं आहे पण सध्या त्याच्या परिवाराला बळ मिळो हीच माझी इच्छा आहे. एक दिवस आम्ही दोघंही वर फुटबॉल खेळू ही आशा आहे.

आणखी वाचा- …आणि मॅरेडोना यांचा तो गोल ‘Hands of God’ म्हणून प्रसिद्ध झाला

आणखी वाचा- मॅरेडोना यांचा वारसा पुढे चालवणारा मेसी म्हणतो…

खरं पहायला गेल्यास मॅरेडोना आणि पेले हे कधीही मैदानात समोरासमोर आले नाहीत. परंतू दोन्ही खेळाडूंच्या झंजावातामुळे त्यांनी तुलना केली जायची. मैदानाबाहेर या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली दोस्ती होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्जेंटिनाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मॅरेडोना यांनी बार्सिलोना, नापोली आणि सेविला या क्लबचही प्रतिनिधीत्व केलं.