भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून इतिहास रचला. त्याने अॅथलेटिक्समध्ये भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. संपूर्ण देश त्याच्या सुवर्ण सोहळ्याचा आनंद साजरा करत आहे. त्याचा सर्वात चांगला मित्र आणि लांब उडीमधील भारतीय खेळाडू तेजस्विन शंकरसुद्धआ या क्षणी खूप भावनिक झाला. जेव्हा त्याने नीरजच्या गळ्यात सुवर्णपदक पाहिले तेव्हा, तो आपल्या मित्रासमोर अश्रू लपवण्याचा प्रयत्न करताना दिसला.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जेव्हा तेजस्विनला भारतीय महिला हॉकी संघाचे वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड यांच्याकडून व्हिडिओ कॉल आला, तेव्हा तो झोपेत होता. तेजस्विनने सांगितले, ”मी व्हिडिओ कॉल उचलला आणि पाहिले, की नीरजच्या गळ्यात पदक आहे. त्या क्षणी त्याला ते स्वप्नासारखे वाटले. त्याने लगेच बाथरूममध्ये जाऊन चेहरा धुवून चेहऱ्यावर टॅल्कम पावडर लावली.”

 

हेही वाचा – Tokyo 2020 : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला आनंद महिंद्रांकडून भलं मोठं Surprise!

तेजस्विनने सांगितले, की त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो टॅल्कम पावडरच्या मदतीने ते लपवण्याचा प्रयत्न करत होता. ”मी नीरजसोबत १५ दिवसांपासून बंगळुरूच्या एका खोलीत राहिलो आहे. जरी नीरज आता ऑलिम्पिक चॅम्पियन बनला असला, तरीही त्याला नीरजसोबत एका खोलीत राहण्याची भीती वाटते”, असे तेजस्विनने सांगितले.

 

तेजस्विनच्या मते नीरज थोडा अव्यवस्थित आहे. ”त्याच्या खोलीत शिरताच त्याचे कपडे बेडवर सुकलेले दिसतील. खोलीच्या मध्यभागी मोजे सापडतील. याबाबत मी नीरजला याबद्दल काहीही सांगितले नाही, कारण त्याच्यासोबत एका खोलीत असणे ही मोठी गोष्ट आहे”, असे तेजस्विन म्हणाला.