इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला अपशब्द वापरून धक्काबुक्की केल्याप्रकरणी सुनावणी करण्यासाठी आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या गॉर्डन लुइस एएम यांची न्यायालयीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. लॉर्ड्स कसोटीच्या अखेरच्या दिवशी या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी होणार आहे.
नॉटिंघहॅमच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनने हे कृत्य केल्याची तक्रार भारतीय संघ व्यवस्थापनाने आयसीसीकडे केली आहे. आयसीसीच्या खेळाडूंच्या आचारसंहितेतील तिसऱ्या स्तरावरील कलमांचे भंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. याचप्रमाणे जडेजावरही दुसऱ्या स्तरावरील कलमांचा भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
शिस्तभंगाची कोणती कारवाई होऊ शकते?
*तिसऱ्या स्तराच्या कलमांचा भंग केल्याचा आरोप असणाऱ्या अँडरसनवर दोन ते चार कसोटी सामने किंवा चार ते आठ एकदिवसीय सामन्यांच्या बंदीची शिक्षा होते. मात्र पुढील सामन्यांवर आधारित ही कारवाई होते.
*दुसऱ्या स्तराच्या कलमांचा भंग केल्याचा आरोप असलेल्या जडेजाच्या सामन्याच्या मानधनाच्या ५० ते १०० टक्के दंड आणि/किंवा एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली जाते.
अँडरसनचे मायदेशात सर्वाधिक बळी
रवींद्र जडेजाला धक्काबुक्की आणि अपशब्द वापरल्याप्रकरणी वादाच्या केंद्रस्थानी असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन गुरुवारी मायदेशात सर्वाधिक बळी घेणारा इंग्लंडचा
गोलंदाज ठरला आहे. फ्रेड ट्रुमॅनचा विक्रम मोडीत काढताना त्याने २३०व्या बळीची नोंद केली. ट्रुमॅनच्या नावावर २२९ बळी आहेत, तर
इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बोथमच्या नावावर २२६ बळींची नोंद आहे. अँडरसनने भारताचा सलामीवीर शिखर धवनला तंबूची
वाट दाखवत या विक्रमाची नोंद केली. ३० वर्षीय अँडरसनच्या खात्यावर ९५ कसोटी सामन्यांत ३०.५०च्या सरासरीने ३५९ बळी जमा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc appoints gordon lewis to hear case against anderson
First published on: 18-07-2014 at 05:59 IST