आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला जाईल. १७ ऑक्टोबरला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाईल. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा भारतातून बाहेर आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल.

‘या’ चार स्टेडियममध्ये होणार सर्व सामने

आयसीसीच्या म्हणण्यानुसार टी-२० वर्ल्डकपचे सर्व सामने यूएई आणि ओमानमधील ४ स्टेडियमवर होणार आहेत. यामध्ये दुबई, अबुधाबीचे शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदान यांचा समावेश आहे.

 

हेही वाचा – माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने गोव्यात भरला ५००० रूपयांचा दंड!

आयसीसी ‘या’ कारणामुळे निराश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसीचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस म्हणाले, ”टी-२० वर्ल्डकप सुरक्षितपणे आयोजित करणे ही आमची प्राथमिकता आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित न झाल्याने आम्ही निराश आहोत. आम्ही बीसीसीआय, अमिरात क्रिकेट बोर्ड आणि ओमान क्रिकेट यांच्याशी एकत्र काम करू, जेणेएकरून चाहत्यांनी या स्पर्धेचा आनंद घेता येईल.”

सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, “बीसीसीआय यूएई आणि ओमान येथे आयसीसी पुरूष टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. करोनाची अट पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय यूएई आणि ओमान येथे या स्पर्धेचे आयोजन करेल आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.”