ICC Fresh Test rankings Joe Root has moved to the top spot: आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. दरम्यान, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज मार्नस लाबुशेन नंबर वनच्या खुर्चीवर विराजमान होता. आता त्याची जागा जो रुटने घेतली आहे. पहिल्याच सामन्यात शतक झळकावल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे त्याने एकाच वेळी पाच स्थानांनी झेप घेतली आहे. आता त्याचे ८८७ रेटिंग पॉइंट आहेत.

जो रूट आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी –

नवीन आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत, जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे, तर केन विल्यमसन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. त्याला ८८३ रेटिंग आहे. आत्तापर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेला मार्नस लाबुशेन केवळ पहिल्या क्रमांकावरून घसरला नाही, तर दुसऱ्या क्रमांकावरूनही घसरला आहे. तो आता ८७७ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे ८७३ रेटिंग पॉइंट असून एका स्थानी घसरला आहे.

RCB's unwanted record
GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी
Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

बाबर आझम अजूनही पाचव्या क्रमांकावर आहे. यासोबतच चार स्थानांनी घसरुन स्टीव्ह स्मिथ आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, उस्मान ख्वाजा हा एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे, जो दोन स्थानांनी पुढे सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. डॅरिल मिशेललाही एका स्थानाचा फटका बसला आहे. तो ७९२ रेटिंग पॉइंटसह आठव्या क्रमांकावर आहे. दामुथ करुणारत्नेलाही एक स्थान गमवावे लागले असून तो आता ७८० च्या रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत अजूनही दहाव्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग ७५८ आहे.

हेही वाचा – POR vs ICE: ख्रिस्तियानो रोनाल्डोने रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव

आर आश्विन पहिल्या स्थानी कायम –

दुसरीकडे, गोलंदाजाच्या कसोटी क्रमवारीबद्दल बोलायचे तर, या यादीत आर आश्विन ८६० रेटिंग पॉइंटसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग पॉइंटसह ८२९ रेटिंग पॉइंटसह आहेत. या दोघांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. कागिसो रबाडाने आता एका स्थानाने झेप घेतली असून तो ८२५ रेटिंग पॉइंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्सला एका स्थानाने घसरु ८२४ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑली रॉबिन्सनला एका स्थानाचा फायदा झाला असून तो ८०२ पाचव्या क्रमांकावर आहे.

नॅथन लायन ७९९ रेटिंग पॉइंटसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. शाहीन शाह आफ्रिदीला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. तो आता ७८७ रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराहचे ७७२ रेटिंग पॉइंटसह आठव्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजा आणि स्टुअर्ट ब्रॉडचे समान रेटिंग पॉइंटसह नवव्या स्थानी आहे, त्यामुळे दोघांनाही नवव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.