Cristiano Ronaldo became the first footballer to play 200 international matches: अनुभवी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. रोनाल्डोने २० जून रोजी पोर्तुगालसाठी २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आइसलँडविरुद्धच्या सामन्यात हा खास टप्पा गाठणाऱ्या रोनाल्डोने विजयी गोल करत हा आनंद खास पद्धतीने साजरा केला. या युरोपियन चॅम्पियनशिप पात्रता सामन्यात पोर्तुगालच्या संघाने १-० असा विजय मिळवला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही या सामन्यापूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने गौरव केला. रोनाल्डोने यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कुवेतच्या बद्र अल-मुतावाचा १९६ सामन्यांचा विक्रम मोडला. आइसलँडविरुद्धच्या या सामन्यात रोनाल्डोनेही ८९व्या मिनिटाला गोल नोंदवून आपल्या शैलीत हा दुहेरी आनंद साजरा केला.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?

३८ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने पदार्पणानंतर जवळपास २० वर्षांनी २०० आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर रोनाल्डोच्या नावावर १२३ आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले गेले आहेत. रोनाल्डोने त्याच्या २०० व्या सामन्यासंदर्भात यूईएफए वेबसाइटला दिलेल्या निवेदनात ही एक अविश्वसनीय कामगिरी असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – Team India: ‘…म्हणून एमएस धोनीला भारतीय संघाचा कर्णधार नियुक्त केले होते’; माजी भारतीय निवडकर्त्याचा खुलासा

हा विजय माझ्यासाठी खूप संस्मरणीय –

आपल्या २०० व्या सामन्याबाबत ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका निवेदनात म्हटले आहे की, मला या टप्प्यावर पोहोचून खूप आनंद होत आहे. हा असा क्षण आहे ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणे ही खरोखरच अविश्वसनीय कामगिरी आहे. या सामन्यात विजयी गोल करणे संघासाठी अतिशय संस्मरणीय ठरले. आम्ही यापेक्षा चांगले खेळू शकलो नसतो. पण हे खेळात घडते. हा विजय माझ्यासाठी खूप संस्मरणीय राहिल.

हेही वाचा – ACC Womens Emerging Cup 2023: टीम इंडियाने पटकावले आशिया कपचे विजेतेपद! बांगलादेशचा ३१ धावांनी उडवला धुव्वा

सध्या फुटबॉलमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत कुवेतचा बद्र अल-मुतावा ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत लिओन मेस्सी १७५ सामन्यांसह ११व्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने क्लब आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १२०४ सामने खेळले आहेत, ३८ वर्षांचा रोनाल्डो अजूनही पूर्णपणे फिट दिसत आहे.