धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल मैदानात जेवढा आक्रमकपणे खेळतो त्यापेक्षा रंगेल तो खासगी आयुष्यात असल्याचे अनेक दाखले आहेत. बिग बॅश ट्वेन्टी-२० लीगमध्ये गेलने महिला पत्रकाराशी अश्लील संभाषण केले होते. त्यानंतर गेलवर चहूबांजूनी टीका झाली होती.
काही क्रिकेटपंडितांनी तर त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र गेलचे समर्थन केल्याचेच चित्र पुढे आले आहे.
याबाबत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्ड्सन म्हणाले की, ‘‘हा प्रकार थांबवता आला असता. माझ्या मते क्रिकेटला याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाही. ही घटना इथेच सोडून आपण पुढे जायला हवे.’’ रिचर्डसन यांनी असे वक्तव्य करीत गेलला ताकीद देणे तर दूरच, पण त्याच्या या वृत्तीचे एक प्रकारे समर्थन केल्यामुळे क्रिकेट वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
ख्रिसच्या रं‘गेल’ वर्तनाला आयसीसीचे समर्थन
गेलने महिला पत्रकाराशी अश्लील संभाषण केले होते. त्यानंतर गेलवर चहूबांजूनी टीका झाली होती.
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 12-01-2016 at 05:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc support chris gayle behavior