Euro 2024 Championship semifinal: स्पेनने तब्बल १२ वर्षांनंतर युरो कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी जर्मनीच्या बर्लिनमधील अलियान्झ एरिना येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा २-१ असा पराभव केला. स्पेनच्या विजयाचे नायक दानी ओल्मो आणि १६ वर्षीय लॅमिने यामल होते.

आता अंतिम फेरीत स्पेनचा सामना रविवारी इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील विजेत्या संघाशी होईल. याआधी स्पेनने २०१२ मध्ये इटलीला हरवून अंतिम फेरी गाठली होती. स्पेनच्या विजयाचे नायक हे १६ वर्षीय लॅमिने यामल आणि दानी ओल्मो ठरले. दोघांनी संघासाठी १-१ गोल केला. सामन्याच्या पहिल्या १० मिनिटांत एक गोल करून फ्रान्सने आघाडी घेतली होती, मात्र १५ मिनिटांनंतर स्पेनने पहिला गोल नोंदवून बरोबरी साधली.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

सामन्याच्या ७व्या मिनिटाला फ्रान्सचा कर्णधार कायलियन एमबाप्पेने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गोलपोस्टपर्यंत पोहोचण्याआधीच येशू नव्हासने त्याच्याकडून बॉल हिसकावून घेतला. अवघ्या दोन मिनिटांनंतर, एमबाप्पेकडे बॉल होता, त्याने लगेच बॉल आपल्या सहकाऱ्याकडे पास केला आणि कोलो मुआनीने हेडरने बॉल गोलपोस्टमध्ये मारून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

हेही वाचा – रोहित शर्माची बायको कुणाला म्हणते ‘वर्क वाईफ’? हिटमॅनने खास पोस्टमध्ये केला मोठा खुलासा

स्पेनचे ४ मिनिटांत २ गोल
फ्रान्सने आघाडी घेतली खरी पण संघ आणि त्याच्या चाहत्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण अवघ्या १५ मिनिटांनी स्पेनने बरोबरी साधली. सामन्याच्या २१व्या मिनिटाला १६ वर्षीय लॅमिने यामलने गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. बरोबर ४ मिनिटांनंतर म्हणजेच २५व्या मिनिटाला डॅनी ओल्मोने गोल करून संघाला २-१ ने आघाडीवर नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वार्धात २-१ने आघाडीवर असलेल्या स्पॅनिश संघाने फ्रेंच संघावर वर्चस्व राखले. पण सामन्याच्या ६०व्या मिनिटाला फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने क्रॉस शॉट मारून स्कोअर बरोबरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमनने हाणून पाडला. स्पेनची आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली आणि स्पेनने हा सामना २-१ अशा फरकाने जिंकला.