Lone Wolf Attack Threat on IND vs PAK Match: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९जून रोजी मोठा सामना होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे असेल. पण या हायव्होल्टेज सामन्यावर दहशतवादी हल्ल्या होणार असल्याचा एक अहवाल समोर आल्यानंतर न्यूयॉर्कच्या आयझेनहॉवर पार्क स्टेडियमवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मॅनहॅटनच्या पूर्वेला २५ मैल अंतरावर असलेल्या आयझेनहॉवर पार्क स्टेडियममध्ये ३ जून ते १२ जून या कालावधीत भारत-पाकिस्तानमधील हाय-प्रोफाइल लढतीसह आठ विश्वचषक सामने होणार आहेत. गव्हर्नर कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ते संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, त्यांच्या माहितीनुसार अजूनपर्यंत त्यांना या संदर्भात कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Rohit Sharma Hilariously Roast Kuldeep Yadav in Viral Video
T20 WC 2024: “मी संघाचा कर्णधार आहे…”, रोहित शर्मा सर्वांसमोर कुलदीपला पाहा काय म्हणाला; VIDEO व्हायरल
Rohit Sharma Rahul Dravid Sprint Towards Cab in Rain Video Viral,
न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

ISIS-K गटाने धमकीचा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या हल्लेखोरांना भारत-पाकिस्तान सामन्यावर ‘लोन वुल्फ’ हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. स्टेडियमच्या वर एक ड्रोन उडताना दाखवला असून त्यावर ९/०६/२०२४ ही तारीख देण्यात आली आहे. त्या व्हीडिओमध्ये कोणत्याही ठिकाणाचे नाव दिले नाही, पण जी तारीख नमूद करण्यात आली आहे,त्याच दिवशी भारत-पाकिस्तान सामना आहे.

लोन वुल्फ हल्ला म्हणजे काय?
लोन वुल्फ हल्ला म्हणजे एक व्यक्ती जमावावर हल्ला करत मोठ्या संख्येने लोकांची हत्या करू शकतात किंवा जास्तीत जास्त नुकसान करू शकतात.

दरम्यान, न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सूचित केले की त्यांचे प्रशासन विश्वचषक सामने कोणत्याही अडचणीशिवाय सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा मोठ्या स्पर्धांसाठी इतका मोठा प्रेक्षक वर्ग असताना या धोक्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे, असं नासो काऊंटीचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर म्हणाले. कमिश्नरने सांगितलं की, “सुरुवातीला ही धमकी जगभरातील वेगवेगळ्या इवेंट्ससाठी होती. पण आता त्यांच लक्ष्य भारत-पाकिस्तान सामन्यावर केंद्रीत आहे.”

हेही वाचा – T20 WC 2024: युगांडा संघाची जर्सी पाहून ICCने उचललं मोठं पाऊल, बदल करण्याचे दिले आदेश; काय आहे नेमकं कारण?

न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी या सामन्यांच्या सुरक्षिततेचे नियोजन करण्यासाठी अनेक महिने काम केले आहे. मी न्यूयॉर्क राज्य पोलिसांना सुधारित सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांची उपस्थिती, वर्धित पाळत ठेवणे आणि तीव्र तपासणी प्रक्रिया समाविष्ट आहेत. सार्वजनिक सुरक्षेला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि क्रिकेट विश्वचषक हा एक सुरक्षित आणि आनंददायक अनुभव असेल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाचे चार सामने न्यूयॉर्कमध्ये खेळायचे आहेत, प्रथम कॅनडाविरुद्ध (५ जून), त्यानंतर ९ तारखेला पाकिस्तानशी, मग १२ जूनला अमेरिकेशी सामना होईला. तर टीम इंडिया १ जून रोजी येथे बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ मंगळवारी अमेरिकेत पोहोचला असून त्यांनी सरावही सुरू केला. तर काही खेळाडू उशिराने संघात सामील होणार आहेत.