टी२० विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेलेला हा सामना भारताने ४ गड्याने सामना जिंकला. या सामन्यात भारताकडून स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी भारताच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली. या सामन्यात विराटबरोबरच हार्दिकनेही मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

सामना संपल्यावर इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांनी हार्दिक पांड्याची मुलाखत घेतली त्यात त्याने अनेक प्रश्नांवर त्याने दिलखुलासपणे उत्तरे दिली. हार्दिक पांड्या सामन्याविषयी बोलताना म्हणाला की, “विराट कोहलीनं आजपर्यंत अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. संघातील वरच्या फळीचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर सुरुवातीला फार कठीण होतं खेळणं. पण मी विराटला सांगितलं की, पाकिस्तान वाल्यांची गोलंदाजी ही अतिशय धारदार आणि आक्रमक अशी होती आणि खेळपट्टीदेखील गोलंदाजांना साथ देणारी होती. पण आम्ही ६ ते १० षटकांपर्यंत आम्ही एकेरी-दुहेरी धावांवर भर देत पुढे इनिंग सुरु ठेवली. शेवटच्या १० षटकात भारताला ११५ धावांची गरज असताना मी म्हटलं की नवाज आणि शादाबच्या षटके मी पाहून घेईन बाकी तू सांभाळ. यानंतर मी नवाज आणि शादाबच्या षटकात मोठे फटके मारत सरासरी आणि धावांची गती कमी केली.”

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Mohit Sharma Unwanted Record
DC vs GT : ऋषभने धुलाई करताच, मोहित शर्मा ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड

पुढे विराट कोहली बाबत बोलताना हार्दिक म्हणाला की, “विराटची फलंदाजी पाहताना आज असे वाटले की, आज त्याचा अॅटिट्युड सुरुवातीपासूनचं वेगळा ठेवला होता, उगीच नाही त्याला किंग कोहली म्हणत. ज्या पद्धतीने त्यानं हरिस रौफला दोन षटकार लगावले, ते माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम षटकार होते. आम्ही फक्त एकच गोष्ट बोलत होतो, एक भागीदारी उभी करुयात आणि शेवटपर्यंत जाऊ असे म्हणत आम्ही पाकिस्तानच्या धावांपर्यंत पोहचण्याचे ठरवले आणि तसेच केले. नवाजचं षटक एकदम योग्य वेळी आलं आणि तिथूनच खर मोमेंटम बदललं.”

हार्दिक पांड्या म्हणाला की,” विराट मला ८ चेंडूत २८ धावांची गरज असताना रौफ विषयी बोलताना म्हणाला जर आपण दोन षटकार आता नाही मारले तर मात्र शेवटच्या षटकात सामना जिंकण अवघड होईल. कारण बाबर शेवटचे षटक हे नवाजला देणार होता. त्याआधीच पाकिस्तानला सामना संपवायचा आहे हे मला समजले होते. असं तो मला म्हणाला. त्यानंतर रौफला मारलेले दोन षटकार हे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.”

हेही वाचा :   IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवताच विराट कोहलीला झाले अश्रू अनावर

इरफान पठाणच्या भावनिक प्रश्नावर हार्दिक म्हणाला की, “माझ्यासाठी हा एकदम भावनिक क्षण आहे. सामना सुरु होण्याआधी मी राहुल द्रविड सरांना एकच गोष्ट सांगितली, मी दहा महिन्यांपूर्वी जिथे होतो, तिथून इथपर्यंत मी आलो हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हे आज जे काही घडलं, ते माझ्या वडिलांसाठी आहे. माझे वडील आज असते तर ते मैदानावर धावत-पळत आले असते. आजचा हा विजय त्यांच्यासाठी आहे. त्यांनी जर मेहनत केली नसती, तर मी कुठे हे सगळं करु शकलो असतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आम्ही सगळे सोबत होतो. जिंकलो तर सोबत, हरलो असतो तरी सोबत हरलो असतो. असे म्हणत त्याने सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.”