T20 World Cup 2022 India vs South Africa Time, Venue, Team Squad: आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियामध्ये होत असून या संपूर्ण विश्वचषकात पाऊस मात्र व्हिलन म्हणून आडवा येताना दिसतो आहे. पाऊस हा विश्वचषकात गेम चेंजर ठरत आहे. आतापर्यंत चार सामने हे या विश्वचषकात पावसामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस गोंधळ घालणार का, याबाबतचे माहिती आता समोर आली आहेत.

विश्वचषकातील चार सामने आतापर्यंत पावसामुळे वाया गेले आहेत, यामधील तीन सामन्यांमध्ये तर पावसामुळे नाणेफेक सुद्धा झाली नाही. त्यामुळे पाऊस हा या विश्वचषकात सर्वात महत्वाचा घटक ठरत आहे. शनिवारी पर्थमध्ये चांगलाच पाऊस झाला आहे. त्यामुळे आता रविवारीदेखील पाऊस पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ येथे खेळला जाणार आहे. हा सामना जो जिंकेल तो उपांत्य फेरी गाठणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. भारत सुपर-१२ चे पहिले दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पर्थची खेळपट्टी पाहिली तर वेगवान आणि उसळी घेणारी आहे, हेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हवे आहे. यामुळे केवळ दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजच भारताची कसोटी पाहतील असे नाही. त्यांच्या संघातील एक फलंदाज भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.

हेही वाचा :   T20 World Cup 2022 : मेलबर्नमधील पराभवानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी घेतली विराट कोहलीची भेट, पाहा फोटो

खेळपट्टीचा अंदाज

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया पर्थमधील वॅका स्टेडियम किती तरी दशके क्रिकेट लढतींचे पारंपरिक स्टेडियम होते; पण आता लढती नव्या ऑप्टस स्टेडियममध्ये आयोजित होत आहेत. स्टेडियम बदलले असले तरी खेळपट्टीचा नूर, ‘मूळ स्वभाव’ कायम आहे. ऑप्टसची खेळपट्टीदेखील चेंडूला वेग आणि उसळी देण्याचे दुहेरी काम करते, ज्यापुढे फलंदाजांच्या गुणवत्तेची कसोटी असते. अशा खेळपट्टीवर जागतिक क्रिकेटमधील रबाडा आणि नॉर्किया या दोन आव्हानात्मक गोलंदाजांना रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव कसे सामोरे जातात यावरही भारताचा निकाल अवलंबून असेल. कगिसो रबाडा चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहे, तर नॉर्कियाचा वेग दीडशेचा आहे. खासकरून पॉवरप्लेमध्ये या दोन्ही गोलंदाजांचा सामना करताना हात आणि डोळ्यांचा समन्वय असणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

सामना कधी, कुठे आणि किती वाजता

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता सुरू होईल. हा सामना पर्थ स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

हेही वाचा :   इथेच टीम इंडिया ३६ वर ऑल आउट झाली होती पण.. गावस्करांनी बाबर आझमला धीर देत सांगितला ‘तो’ किस्सा

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

दक्षिण आफ्रिका

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, कागिसो रबाडा, रिली रोसोव, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन जॅन्सेन, मार्को जॅनसेन.