टी-२० विश्वचषक २०२२ इंग्लंडने जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० मध्ये एकाच वेळी विश्वविजेता ठरणारा इंग्लंड हा पाहिलाच देश ठरला आहे. भारतीय संघ या स्पर्धेमधून उपांत्य फेरीत विश्वविजेत्या इंग्लंडकडून १० गडी राखून दारुण पराभवासहीत बाहेर पडला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या टी-२० क्रिकेटच्या धोरणांबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहे. अनेकांनी तर सोशल मीडियावर भारतीय खेळाडू इंडियन प्रिमियर लीगमध्ये कसे खेळतात आणि भारतीय संघासाठी कसे खेळतात याबद्दलही भाष्य केलं आहे. भारत इंग्लंडविरोधात पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला त्यावेळी रोहित शर्माने जिंकलेल्या पाच आयपीएल ट्रॉफीही सोशल मिडियावर चर्चेत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> “९३ हजार विरुद्ध शून्य हा अजूनही…”; नाद करा पण आमचा कुठं! भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांना Final नंतर लष्करी अधिकाऱ्याचा रिप्लाय

भारताचे अनेक माजी खेळाडूही भारतीय संघाच्या धोरणावर नाराज आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही विद्यमान खेळाडूंना इंडियन प्रिमियर लीगचा संदर्भ देत चांगलेच फैलावर घेतले आहे. जर तुम्ही टी-२० क्रिकेटमध्ये चार षटकांसाठी गोलंदाजी करु शकत नाही तर तुम्ही क्रिकेट कसं खेळणार असा प्रश्न गावस्करांनी उपस्थित केला आहे. भारताचे अनेक माजी खेळाडूही भारतीय संघाच्या धोरणावर नाराज आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही विद्यमान खेळाडूंना इंडियन प्रिमियर लीगचा संदर्भ देत चांगलेच फैलावर घेतले आहे. जर तुम्ही टी-२० क्रिकेटमध्ये चार षटकांसाठी गोलंदाजी करु शकत नाही तर तुम्ही क्रिकेट कसं खेळणार असा प्रश्न गावस्करांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> Eng vs Pak: ‘कर्माने हरलात’ टीकेवरुन शाहीद आफ्रिदीचा मोहम्मद शामीला सल्ला; म्हणाला, “तू तर सध्या संघाचा भाग आहेस त्यामुळे…”

‘आजतक’ वृत्तवाहिनीवरील ‘खेल तक’ नावाच्या कार्यक्रमामध्ये सुनील गावस्कर यांनी भारतीय संघातील खेळाडूंबद्दलचा आपला संताप व्यक्त केला. “जर तुम्हाला एकाहून अधिक देशांचा समावेश असणारी स्पर्धा खेळायची असेल तर संघामध्ये जास्त बदल करण्याची गरज नाही. तुम्ही सगळ्या गोष्टींना वर्कलोड असं सांगत असाल तर ते कसं चालणार? चार षटकांची गोलंदजीसुद्धा तुम्हाला वर्कलोड वाटत असेल तर तुम्हाला लय कशी गवसणार? वर्कलोड हा शब्दच भारतीय संघाच्या शब्दकोषातून काढून टाकला पाहिजे,” असं गावस्कर म्हणाले.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर रात्री सव्वाबाराला गौतम गंभीरची संभ्रमात टाकणारी पोस्ट; म्हणाला, “तुम्ही केवळ…”

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना झाला आहे. मात्र या मालिकेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन गवस्करांनी, “सतत संघ बदलत राहिल्यास योग्य जोड्या कोणत्या किंवा लय कशी गवसणार. जर तुम्हाला ठाऊकच नसेल की पुढल्या सामन्यात तुमच्याबरोबर सलामीला कोण येणार आहे तर तुम्ही तयार कसे होणार?” असा सवाल उपस्थित केला.

नक्की वाचा >> World Cup: पाकिस्तानचे PM इरफानकडून क्लिन बोल्ड; 152/0 vs 170/0 वर म्हणाला, “तुमच्यात अन् आमच्यात हाच फरक आहे की आम्ही…”

गावस्कर यांनी थेट आयपीएलसाठी खेळताना खेळाडू कसे वागतात आणि देशासाठी खेळताना खेळाडू कसे वागतात याची तुलना करत अगदी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. “जेव्हा भारतासाठी खेळात तेव्हा तुम्हाला वर्कलोडची आठवण होते. मात्र जेव्हा आयपीएल खेळता तेव्हा वर्कलोड विसरुन जाता,” असा टोला गावस्करांनी लगावला.

नक्की वाचा : Team India: यापुढे विराट, रोहितला टी-२० संघात स्थान नाही? BCCI च्या सूत्रांची माहिती; म्हणाले, “बीसीसीआयने कधीच…”

“टी-२० मध्ये एवढं वर्कलोड असतं असं मला वाटत नाही. मला स्वत:ला अनुभव नाही. मी टी-२० खेळलेलो नाही,” असंही गावस्कर म्हणाले. “तुम्ही जेव्हा देशासाठी म्हणजेच भारतासाठी खेळतात त्यावेळेस वर्कलोड हे कधीच कारण असता कामा नये,” अशी अपेक्षाही गावस्कर यांनी व्यक्त केली. “गोलंदाजांच्याही जोड्या असतात. ते संवाद साधून चांगली कामगिरी सामन्यात करु शकतात. मात्र वर्कलोड म्हणून तुम्ही गोलंदाजांना विश्रांती दिली तर कसं चालणार?” असा प्रश्नही गावस्कर यांनी उपस्थित केला.

“तुम्ही आयपीएलचं संपूर्ण पर्व खेळता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अनेकदा प्रवास करता. तेव्हा तुम्हाला थकवा जाणवत नाही? तेव्हा वर्कलोड नसतो का?फक्त तुम्ही भारतासाठी खेळता आणि ते सुद्धा फार ग्लॅमरस देशाचा दौरा असतानाच तुम्हाला वर्कलोड आठवतो का? हे फार चुकीचं आहे,” असंही गावस्कर या कार्यक्रमात म्हणाल्याचं ‘क्रिकेट ट्रॅकर इंडिया’ने आज तकच्या सैजन्याने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar slams team india says players do not find it as workload when play ipl but give same excuse while playing for india scsg
First published on: 14-11-2022 at 15:05 IST