शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ च्या सामन्यामध्ये इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत करत उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. श्रीलंकन संघाच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलिया या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत जाणार की नाही हे निश्चित होणार होतं. मात्र श्रीलंकेला इंग्लंडविरोधात विजय मिळवता आला नाही आणि यजमान संघ बाहेर पडला. इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठं विधान केलं असून त्याने भारत विरुद्ध इंग्लंड सामना होईल असं भाकित व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश; नेदरलँड्सनं जाताजाता दिलं ‘गिफ्ट’

इंग्लंडने श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर ब्रॉडने ट्वीटरवरुन आपलं मत व्यक्त करताना इंग्लंड उपांत्य फेरीत जाईल की नाही याबद्दल शंका वाटत होती असं म्हटलं आहे. “काम झालं. स्पर्धेतून बाहेर पडू की काय अशी भिती वाटत होती. मात्र विश्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं,” असं ब्रॉडने ट्वीटच्या पहिल्या ओळीत म्हटलं आहे. दुसऱ्याच ओळीत त्याने भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना होईल असं म्हणत एक मोठं विधान केलं आहे.

नक्की वाचा >> World Cup Final: …तर भारत-पाकिस्तान ड्रीम फायनल्स! पुढचा रविवार ठरणार ‘सुपर संण्डे’; समजून घ्या यामागील नेमकं गणित

“कादचित हा (उपांत्य फेरीचा) सामना भारत विरुद्ध इंग्लंड असा होईल. या उपांत्य फेरीतील सामन्याचा विजेता अंतिम सामन्यात प्रवेश करेल आणि विश्वचषक जिंकेल असं माझं मत आहे. कारण दोन्ही संघांमध्ये सामना जिंकवून देणारे खेळाडू आहेत,” असं ब्रॉडने याच ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

टी-२० विश्वचषकामध्ये पहिल्या गटातील अव्वल संघ दुसऱ्या गटामधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. तर दुसऱ्या गटातील अव्वल संघ पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघांशी सामना खेळणार आहे. आज सकाळी झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पराभूत झाला. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव झाला. नेदरलँड्सने १५८ धावा करुन दिलेलं लक्ष्य आफ्रिकेला झेपलं नाही. दक्षिण आफ्रिकेने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडूंमध्ये २६ धावा हव्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ १२ धावा करता आल्या. नेदरलँड्सच्या विजयाबरोबरच भारत हा दुसऱ्या गटातून पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंडमध्ये सामना होणं जवळ जवळ निश्चित मानलं जात आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

भारत आणि इंग्लंडच्या संघादरम्यान टी-२० चे २२ सामने झाले असून त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक सामने भारताने जिंकले आहेत. इंग्लंड आणि भारतादरम्यान झालेल्या तीन टी-२० विश्वचषक सामन्यांपैकी एकामध्ये इंग्लडने विजय मिळवला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता या वर्षीच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये भारत आपलं वर्चस्व कायम राखणार की इंग्लंड भारताला धक्का देणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल.

नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि इंग्लंडमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाल्यास तो १० तारखेला अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाईल. या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच ९ तारखेला न्यूझीलंड विरुद्द पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यानच्या विजेता संघ सामना खेळेल. त्यामुळे भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधीच अंतिम समन्यातील प्रतिस्पर्धी निश्चित झालेला असेल.