टी२० विश्वचषक २०२२ मध्ये, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर सामना होत आहे. या सामन्यातील विजेता २०२२ च्या टी२० विश्वचषकातील सुपर-१२ मध्ये पोहोचेल. २०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने ग्रुप स्टेजमध्ये आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. त्यात एक सामना जिंकला असून दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आयर्लंडनेही २ पैकी एक जिंकला आहे. दोन वेळा टी२० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडीजसाठी हा सामना म्हणजे करो या मरो अशा प्रकारचा आहे.  ग्रुप बी मधील ४ संघापैकी २ संघाना सुपर-१२ मध्ये पात्र होण्याची संधी असून स्कॉटलंड, आयर्लंड, वेस्ट इंडिजसह झिम्बाब्वेमध्ये ही चुरस आहे. आज दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड आणि दुसरा सामना स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे असा रंगणार आहे.

कसे असेल समीकरण

वेस्ट इंडीजने आजचा सामना जिंकल्यास त्यांचे ३ सामन्यानंतर ४ गुण होतील आणि आपोआपच ते सुपर -१२ साठी पात्र होतील. मात्र ते जर हरले तर सगळं गणित हे नेट रनरेटवर अवलंबून असेल. कारण वेस्ट इंडीजचा नेट रनरेट हा -०.२७५ असून तो आयर्लंडपेक्षा थोडा चांगला आहे पण तरी देखील आयर्लंड ही गुणांच्या आधारे हा सामना जिंकला तर पात्र होऊन सुपर-१२ मध्ये पोहचू शकते. दुसरीकडे झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड सामन्याचा विचार केला तर त्याचे देखील गुण सध्या प्रत्येकी २-२ आहेत. आणि नेट रनरेटही प्लसमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी जो जिंकेल तो सुपर-१२ मध्ये आपले स्थान निश्चित करेल.

हेही वाचा :  T20 World Cup 2022 : बीसीसीआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बुमराहबाबत केले मोठे वक्तव्य, म्हणाले बुमराह….! 

याआधी ग्रुप ‘ए’ मधून सुपर १२ साठी श्रीलंका आणि नेदरलँडने एन्ट्री मिळवल्याने युएई आणि नामिबियाचा संघ आपोआपच स्पर्धेबाहेर झाले आहेत. उद्यापासून मुख्य सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना रविवारी २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.